Mumbai Local Horror : क्रूरतेचा कळस! लेडीज डब्यात घुसखोरी करणाऱ्या नराधमाची मुजोरी, १८ वर्षीय विद्यार्थिनीला ५० वर्षीय प्रवाशाने धावत्या लोकलमधून ढकललं

नवी मुंबई : महिलांच्या डब्यात बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला हटकणे एका १८ वर्षीय तरुणीच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. पनवेल ते खांदेश्वर स्थानकांदरम्यान हार्बर लोकलमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. महिलांच्या डब्यात शिरलेल्या या इसमाला तेथील प्रवाशांनी जाब विचारला असता, त्याने क्रूरतेचा कळस गाठत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलून दिले.



नक्की काय घडली घटना?




मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय शेख अख्तर नवाज हा आरोपी पनवेलहून सुटलेल्या लोकलच्या महिलांच्या डब्यात शिरला होता. डब्यातील महिलांनी त्याला पुरुष असून महिलांच्या डब्यात का चढला, असा सवाल करत खाली उतरण्यास सांगितले. यामध्ये १८ वर्षांची श्वेता महाडिक ही विद्यार्थिनी पुढाकार घेऊन त्याला जाब विचारत होती. यामुळे संतापलेल्या आरोपीने श्वेतासोबत वाद घातला आणि गाडीचा वेग वाढताच तिला दारातून बाहेर ढकलून दिले. धावत्या गाडीतून फेकल्या गेल्यामुळे श्वेता गंभीररीत्या जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी (GRP) तातडीने सापळा रचून अटक केली आहे. आरोपीवर खुनाचा प्रयत्न आणि रेल्वे कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या डब्यात भरदिवसा घुसखोरी करणाऱ्या अशा प्रवृत्तींविरुद्ध आता कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.



नराधमाचा पळ काढण्याचा प्रयत्न


दरम्यान, पनवेल-खांदेश्वर दरम्यान एका १८ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून फेकून देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पीडित तरुणीला ढकलल्यानंतर आरोपी शेख अख्तर नवाज (५०) याने खांदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरून गर्दीचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, डब्यातील महिला प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे पोलिसांनी त्याला पळ काढण्यापूर्वीच ताब्यात घेतले. आरोपी शेख अख्तर याच्यावर पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये बीएनएस (BNS) कलम १०९ (जीवे मारण्याचा प्रयत्न) यासह भारतीय रेल्वे अधिनियमातील कलम १६२ आणि १३८ चा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासातून आरोपीबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेख हा एक फिरस्ता असून त्याचे कोणतेही नातेवाईक किंवा ठराविक पत्ता नाही. प्राथमिक तपासादरम्यान त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसून आले आहे. याच मानसिक स्थितीमुळे किंवा वैफल्यातून त्याने हे टोकाचे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, भरदिवसा महिलांच्या डब्यात घुसून तरुणीला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या या इसमावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. या घटनेत डब्यातील इतर महिला प्रवाशांनी तातडीने आरडाओरडा करून रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळेच आरोपीला स्थानकाबाहेर पडण्याआधीच पकडणे शक्य झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडित तरुणीच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारीक लक्ष आहे.

Comments
Add Comment

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद मुंबई : राज्यातील

मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई  : मुंबईत उबाठा

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना