बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने (आयव्हीएसी) चितगाव येथे असलेल्या सर्व व्हिसा सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. आयव्हीएसी बांगलादेशने स्पष्ट केले आहे की, रविवारपासून पुढील आदेश येईपर्यंत व्हिसा सेवा निलंबित राहतील.शहरातील भारताच्या सहाय्यक उच्चायोगाच्या (एएचसीआय) परिसरात घडलेल्या एका सुरक्षा घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयव्हीएसीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, स्थानिक परिस्थितीची सखोल पाहणी केल्यानंतरच व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थिती लक्षात घेता कोणतीही ठराविक तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा बांगलादेशच्या अनेक भागांत हिंसक घटनांचे सत्र सुरू आहे.

दरम्यान, रविवारी मयमनसिंह जिल्ह्यात २७ वर्षीय हिंदू युवक दीपुचंद्र दास यांच्या हत्येप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली. आरोपांनुसार, काही कथित आरोपांवरून जमावाने त्या युवकावर हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद यूनुस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या अटकांची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की रॅपिड अॅक्शन बटालियन (आरएबी) ने ७ तर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली.

या प्रकरणामुळे तणाव इतका वाढला आहे की राजधानी ढाक्यातही सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. ढाका विद्यापीठ परिसरात इन्कलाब मंचचे संयोजक शरीफ उस्मान हादी यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या समर्थकांनी शाहबाग परिसराकडे मोर्चा काढला. काही दिवसांपूर्वी हादी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ढाक्यात सातत्याने आंदोलन सुरू आहेत. रविवारीही शाहबाग चौकात मोठ्या संख्येने लोक जमा होऊन न्यायाची मागणी करताना दिसून आले.
Comments
Add Comment

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प