‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ सुरू आहे. लोकप्रिय प्रीमियम अंडी ब्रँड ‘एगोज’ (एगोज न्यूट्रीशियन)च्या अंड्यांमध्ये कॅन्सरचा धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित अँटीबायोटिकचे अवशेष आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारानंतर भारताची सर्वोच्च अन्न नियामक संस्था 'एफएसएसएआय' (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) ॲक्शन मोडमध्ये आली असून त्यांनी देशभरातून अंड्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.


'ट्रस्टिफाइड' नावाच्या एका प्रसिद्ध यूट्यूब चॅनलने 'एगोज' अंड्यांच्या लॅब टेस्टिंगचा अहवाल सार्वजनिक केला आहे. या अहवालानुसार, अंड्यांच्या एका बॅचमध्ये 'AOZ' नावाच्या संयुगाचे प्रमाण ०.७३ पीपीबी आढळले आहे. AOZ हे 'नायट्रोफ्युरन्स' या प्रतिबंधित प्रतिजैविकाचा अवशेष आहे. भारतात या रसायनाच्या वापरावर कडक बंदी आहे.



एफएसएसएआयची मोठी कारवाई



  1. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यानंतर एफएसएसएआयने तातडीने दखल घेतली आहे.

  2. नमुने गोळा करणे : सर्व प्रादेशिक कार्यालयांना ब्रँडेड आणि विना-ब्रँड अशा दोन्ही प्रकारच्या अंड्यांचे नमुने गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.

  3. प्रयोगशाळा तपासणी : हे नमुने देशातील १० वेगवेगळ्या अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.

  4. प्रतिबंधित घटकांचा शोध : अंड्यांमध्ये 'नायट्रोफुरंटोइन' सारख्या प्रतिबंधित अँटीबायोटिक्सचे अवशेष आहेत का, याची सखोल चौकशी केली जाईल.


ग्राहकांनी काय करावे?


जोपर्यंत अधिकृत अहवाल येत नाही, तोपर्यंत ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. हा वाद सध्या एका विशिष्ट ब्रँडशी संबंधित असला, तरी संपूर्ण अंडी उद्योगाची विश्वासार्हता आता पणाला लागली आहे. एफएसएसएआयच्या तपासणीनंतरच अंड्यांच्या सुरक्षिततेबाबतचे चित्र स्पष्ट होईल. अधिकृत माहिती आणि अपडेट्ससाठी ग्राहक एफएसएसएआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.



आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?


तज्ज्ञांच्या मते, नायट्रोफ्युरन्सचा संबंध ‘जेनोटॉक्सिसिटी’शी आहे. याचा अर्थ असा की, हे रसायन मानवी डीएनए खराब करू शकते आणि यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना आजारांपासून वाचवण्यासाठी बेकायदेशीरपणे या औषधांचा वापर केल्यास त्याचे अंश अंड्यांमध्ये उतरतात.

Comments
Add Comment

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा

राजस्थानच्या फतेहपूर-माउंट अबूमध्ये तापमान ४ अंश सेल्सिअस

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह ८ राज्यांमध्ये शनिवारी सकाळी कडाक्याच्या थंडीसह दाट

होमगार्ड पदासाठी पदवीधरांची गर्दी

भुवनेश्वर  : ओडिशात संबलपूर येथे होमगार्डच्या भरती परीक्षेसाठी ८ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची