नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत २८८ पैकी १२९ जागांवर भाजपचा निर्विवाद विजय

मुंबई : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने राज्यभरात घवघवीत यश मिळवले असून, भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तीन ते चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत जनतेने विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत महायुतीला कौल दिला. महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला असून, त्यांचा प्रभाव नाममात्र राहिला.


राज्यातील एकूण २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल रविवारी (२१ डिसेंबर २०२५) जाहीर झाले. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट झाले. महायुतीला सुमारे २१४ हून अधिक जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा आणि स्थानिक आघाड्या तथा अपक्षांना २५ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, एकट्या भाजपचे १२९, नगराध्यक्ष आणि ३ हजार ३२५ नगरसेवक निवडून आले. उबाठा आणि शरद पवार गटाला दोन आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान "२० तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर पुढची पाच वर्षे तुमची काळजी देवाभाऊ घेईल", असे आवाहन केले होते. ते जनतेला भावले. या निवडणुकीत भाजपने १२९ नगराध्यक्षपदे मिळवली, तर महायुतीचे घटकपक्ष शिवसेना ५१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ जागा जिंकल्या.



कोणाच्या किती जागा ?


पक्ष - नगराध्यक्ष - सदस्य
भाजप - १२९ - ३३२५
शिवसेना - ५१ - ६९५
राष्ट्रवादी - ३५ - ३११
काँग्रेस - ३५ - १३१
उबाठा - ९ - ३७८
शरद पवार गट - ७ - १५३
इतर - २२ - १४०



विभागनिहाय निकाल :


- विदर्भ (१०० जागा): भाजप ५८, शिवसेना ८, राष्ट्रवादी ७, काँग्रेस २३, उबाठा ०, शरद पवार ०, इतर ४.
- मराठवाडा (५२ जागा): भाजप २५, शिवसेना ८, राष्ट्रवादी ६, काँग्रेस ४, उबाठा ४, शरद पवार २, इतर ३.
- उत्तर महाराष्ट्र (४९ जागा): भाजप १८, शिवसेना ११, राष्ट्रवादी ७, काँग्रेस ५, उबाठा २, शरद पवार १, इतर ५.
- पश्चिम महाराष्ट्र (६० जागा): भाजप १९, शिवसेना १४, राष्ट्रवादी १४, काँग्रेस ३, उबाठा १, शरद पवार ३, इतर ६.
- कोकण (२७ जागा): भाजप ९, शिवसेना १०, राष्ट्रवादी १, काँग्रेस ०, उबाठा २, शरद पवार १, इतर ४.



मागील नगराध्यक्ष संख्या


भाजप - ९४
शिवसेना - ३६
काँग्रेस - ५१
राष्ट्रवादी - २९
इतर - २८
अपक्ष - २२

Comments
Add Comment

सिंधुदुर्गच्या चारही नगराध्यक्ष पदांवर राणे कुटुंबाचे वर्चस्व कायम, उबाठा भुईसपाट

संतोष राऊळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांचे वर्चस्व सिद्ध

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचाच बोलबाला

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या चार नगर परिषद व लांजा, देवरूख व गुहागर या तीन नगर

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची दादागिरी

पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने १७ पैकी १०

अहिल्यानगरवर महायुतीचा झेंडा

सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष वेधून घेणाऱ्या ऐतिहासिक अहिल्यानगर

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची सरशी

धनंजय बोडके नाशिक जिल्ह्यातील ११ ठिकाणच्या नगरपरिषदांमध्ये जाहीर झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निकालात

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने