निर्मिती सावंत - प्रार्थना बेहरे झळकणार सासू-सुनेच्या भूमिकेत

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओजचा बहुचर्चित मराठी चित्रपट 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पाठमोऱ्या दिसणाऱ्या सासू-सुनेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला होता, तो म्हणजे ही जोडी नेमकी कोणाची? आणि आता या प्रश्नाचं उत्तर देत, मनोरंजनाची पूर्ण तयारी करत चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित झाला आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या टिमने मुंबईतील महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेत, चित्रपटाच्या टिझरचे आणि पोस्टरचे अनावरण केले.


या चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार असून, सासू-सुनेची एक हटके, ताकदवान आणि तितकीच खमंग जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमध्येच दोघींची जुगलबंदी, टोमणे, मिश्कील संवाद आणि भावनिक क्षण यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतोय. प्रार्थना बेहरे आधुनिक, आत्मविश्वास आणि स्पष्टवक्ती सून म्हणून दिसत आहे, तर निर्मिती सावंत पारंपरिक, ठाम मतांच्या आणि अनुभवसंपन्न सासूबाईंच्या भूमिकेत लक्ष वेधून घेत आहेत. समाजात नेहमी म्हटलं जातं की, ''प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते'', परंतु एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री ठामपणे उभी राहिली तर, ती नाती किती बळकट होऊ शकतात, हाच विचार हा चित्रपट अतिशय सहज आणि प्रभावीपणे मांडतो. दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात,


''ही कथा आजच्या काळातील सासू–सुनेच्या नात्याची आहे. दोघीही स्वतंत्र विचारांच्या आहेत, स्वतःच्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे मतभेद होतात, नोकझोक होते, परंतु त्याचबरोबर दोघींच्या समजूतदारपणाची आणि त्यांच्या तरल नात्याची सुंदर कहाणी यात आहे. सासू आणि सून एकमेकींच्या आयुष्यात आधार बनू शकतात, ही भावना या चित्रपटाचा गाभा आहे.”


झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Comments
Add Comment

६ फेब्रुवारीला लागणार 'लग्नाचा शॉट'!

लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि तयारी... …पण कधी कधी हाच आनंद गोंधळात बदलला तर? अशाच एका गोंधळावर आधारित ‘लग्नाचा शॉट’

बॉलीवूड क़्विन माधुरी दिक्षित साकारणार नवी भूमिका: जाणून घ्या कुठे आणि कधी पाहायला मिळणार ...

मुंबई : बॉलीवूडची ग्लॅमर्स अभिनेत्री माधुरी दीक्षित साकारणार हटके भूमिका. ott वर चर्चेत असणारी वेब सिरीज म्हणजेच Mrs

Bollywood actress Shilpa Shetty... बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आणखी एक दणका! मुंबईतील या घरावर आयकर विभागाचा छापा

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि ती तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत कायम वाढ होताना दिसत आहे.

Dhurandhar Box Office Collection Day 14 : बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा अक्षरशः धुमाकूळ! 'पुष्पा २' पासून 'स्त्री २' पर्यंत, बॉक्स ऑफिसवर दिग्गज चित्रपटांना चार मुंड्या चीत

मुंबई : बॉलिवूडचा 'पॉवरहाऊस' अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि प्रतिभावान अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांची प्रमुख

Kranti Redkar Twins...'मला जुळं होणार हे कळल्यावर माझ्या....क्रांतीने रेडकरने सांगितला तो खतरनाक किस्सा

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच सोशल मीडिया अकाउंट वर ऍक्टिव्ह असते. तिच्या रील मधून ती मजेशीर

'कैरी' चित्रपटातील सायली संजीवची मध्यवर्ती भूमिका प्रत्येक स्त्रीच्या हृदयाला करणार स्पर्श

'प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो', असे नेहमीच ऐकायला मिळते. पण असे उलट वाक्य स्त्रियांच्या बाबतीत फार कमी