भारताच्या परकीय चलनसाठ्यात १.६७ अब्ज डॉलरने वाढ

मुंबई: १२ डिसेंबरपर्यंत संपलेल्या आठवड्यापर्यंत १.६८ अब्ज डॉलरने परकीय चलनात (Forex Reserves) वाढ झाली आहे. ज्यामुळे आता साठा ६८८.९४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आरबीआयच्या आकडेवारीत हे स्पष्ट झाले असून सोन्यातील वाढलेल्या साठवूकीमुळे व परकीय चलनातील वाढलेल्या मार्जिनमुळे वाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. एफसीए (Foreign Currency Assets FCA) ज्याला सर्वात मोठी किटी अथवा परकीय चलनाचा भाग समजला जातो तो १२ डिसेंबरपर्यंत सर्वाधिक प्रमाणात वाढला आहे. या आठवड्यात तो ०.९१ अब्ज डॉलरने वाढत ५५७.७९ अब्ज डॉलरवर पोहोचला. भारताच्या सोन्याच्या साठ्यातही मोठी वाढ झाल्याचे या आकडेवारीत स्पष्ट झाले.


एकूण सोन्याचा साठा आता ०.७६ अब्ज डॉलरने वाढल्याने तो आता १०७.७४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. मोठ्या प्रमाणात अस्थिरता वाढल्याने भारताची आर्थिक परिस्थिती भक्कम राखण्यासाठी आरबीआयने व्ह्यूरचना केली होती. ज्याचे फळ आकडेवारीतून दिसते.


भारताने वाढत्या अस्थिरतेमुळे चलनवाढ नियंत्रित राखण्यासह हेजिंग करत सोन्याचा साठा मुबलक प्रमाणात राखला. तसेच आकडेवारीनुसार विविध मालमत्तेत केलेल्या गुंतवणूकीमुळे बॅलन्सिंगला मदत प्राप्त झाली आहे असे समजते. यापूर्वीच्या आठवड्यातही सोन्याच्या साठ्यात १.०३ अब्ज डॉलरने वाढ झाली असून तेव्हा पातळी ६८७.२६ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. जागतिक पातळीवरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे असलेल्या राखीव एसडीआर (Special Drawing Rights SDR) मध्ये ०.०१ अब्ज डॉलरने किंचित वाढ झाली असून तो साठा ४.६९ अब्ज डॉलरवर पोहोचला असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. यापूर्वी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना भारताला सहज ११ महिने पुरेल इतका चलनसाठा असल्याचे स्पष्ट केले होते. सोन्याचाही साठा मुबलक असल्याने सध्या नवा कुठलाही धोका बाजारात दिसत आहे असे दिसते.

Comments
Add Comment

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद मुंबई : राज्यातील

मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई  : मुंबईत उबाठा

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना