मतदार याद्यांच्या सखोल तपासणीतून तामिळनाडूत ९८ लाख नावे हटविली

मृत, स्थलांतरीत, तसेच दुबार-तिबार नावांचा समावेश


२६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश , ६६ लाख ४४ हजार मतदार कायमस्वरूपी स्थंलातरीत , ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदार


नवी दिल्ली :  सध्या देशातील काही राज्यांत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणादरम्यान, तामिळनाडूमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयआरनंतर तयार करण्यात आलेल्या तामिळनाडूमधील मतदार यादीच्या मसुद्यामधून तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ नावे हटववण्यात आली आहेत. तर नव्या मतदार यादीच्या मसुद्यामध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश आहे.


तामिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणानंतर तयार करण्यात आलेल्या राज्यातील मतदार याद्यांच्या मसुदा यादीमध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ६६ हजार महिला आणि २ कोटी ७७ लाख पुरुषांचा समावेश आहे. एसआयआर पूर्वी तामिळनाडूमध्ये सुमारे ६ कोटी ४१ लाख नोंदणीकृत मतदार होते. तसेच या प्रक्रियेनंतर त्यापैकी तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत.



नोंदणीकृत पत्त्यावर मतदार आढळलेच नाही


हटवण्यात आलेल्या मतदारांमध्ये २६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश आहे. तर ६६ लाख ४४ हजार मतदार असे आहेत; जे कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेले आहेत. ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदारांची नावेही यादीतून हटवण्यात आली आहेत. या मतदारांची नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवलेली आहेत. ज्या मतदारांना स्थलांतरीत म्हणून चिन्हांकित करण्यात आले होते. त्यातील ६६ लाख ४४ हजार ८८१ मतदार राज्यात घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या पडताळणीच्या तीन टप्प्यांनंतरही नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आले नसल्याची माहिती अर्चना पटनायक यांनी दिली.



मतदारांना हटवण्याचा कट


दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतरही तामिळनाडूमध्ये एसआरआयची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने एसआयआरविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकादेखील दाखल केली होती. आता एसआयआरवर टीका करताना स्टॅलिन यांनी त्याचा लोकशाहीविरोधी पाऊल असा उल्लेख केला आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

एमएमआरडीए उभारणार नवा पादचारी पूल मुंबई  : वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि लकी हॉटेल जंक्शन परिसरातील तीव्र

मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबईतील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून काम केले!

आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप मुंबई : नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपची बी-टीम

बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कहर; नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ढाका : बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला असून लक्ष्मीपूर सादर उपजिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना