काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या चार नगरसेवकांचे भवितव्य काय?

आरक्षणामुळे वॉर्ड गेले, आता पुनर्वसन करायचे कुठे? पक्षापुढे पेच!


मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता आरक्षण जाहीर झाले असून, यामध्ये सर्वांधिक फटका काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांसह चार नगरसेवकांचे वॉर्डच गायब झाले आहे. आता आरक्षित वॉर्डच न राहिल्याने भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचे पुनर्वसन कुठे करावे हा प्रश्न आता भाजपा पुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता रवी राजा, राजेंद्र नरवणकर, जगदीश अमिन कुट्टी तसेच श्वेता कोरगावकर यांना उमेदवारी कुठून द्यायची हाच मोठा प्रश्न आहे.


उबाठातील माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करु लागल्यांनतर भाजपाने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्वप्रथम मुंबई सेंट्रल येथील माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर, मरोळमधील जगदीश अमिन कुट्टी, अँटॉप हिलमधील नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते रवी राजा आणि आता बोरीवलीतील श्वेता कोरगावकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे.


यापैंकी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा प्रभाग क्रमांक १७६ हा ओबीसी महिला राखीव झाला आहे.परंतु, शीव कोळीवाडा मतदारसंघात आसपास एकही मतदारसंघ सर्वसाधारण झालेला नाही. त्यामुळे रवी राजा यांचे पुनर्वसन कुठल्या प्रभागात करायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे रवी राजा यांना भाजपात धारावीत पाठवते का आणि शीव कोळीवाडा सोडून रवी राजा हे धारावीत जातील का असा प्रश्न उपस्थित आहे .


तर काँग्रेसचे राजेंद्र नरवणकर हे प्रभाग २१६ मधून निवडून आले होते. परंतु हा प्रभाग पूर्वी ओबीसी राखीव होता तर आता ओबीसी महिला राखीव झाला आहे. त्यामुळे राजेंद्र नरवणकर यांना दुसऱ्या वॉर्डाचा शोध घ्यावा लागणार आहे . त्यामुळे नरवणकर यांना बाजुचा खुला झालेल्या प्रभाग २१७ मध्ये संधी आहे. तसेच प्रभाग २१९ हा प्रभाग ओबीसी राखीव झाला आहे. त्यामुळे राजेंद्र नरवणकर यांचे मलबार हिलमधून पुनर्वसन करणे शक्य असले तरी मलबार हिलमध्ये त्यांचे पुनर्वसन होणार का,असा प्रश्न आहे. रवी राजा आणि राजेंद्र नरवणकर यांचे दोघांचेही वॉर्ड गेल्याने त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही याची हमी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे त्यांचे पुनर्वसन कुठे होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.


काँग्रेसचे प्रभाग क्रमांक ८२चे जगदीश अमिन कुट्टी यांचा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाल्याने ओबीसी महिला राखीव झाल्याने ते आपली पत्नी जगदीश्वरी कुट्टी यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यास तयार आहेत. त्यामुळे अमीन कुट्टी यांना स्वत:ला निवडणूक लढवता येणार नसून ते आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात. तर काही दिवसांपूर्वी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ९मधील काँग्रेसच्या श्वेता कोरगावकर यांचा प्रभाग खुला झाला आहे. हा प्रभाग खुला झाल्याने श्वेता कोरगावकर यांना भाजपात प्रवेश दिला आहे. परंतु याप्रभागातून माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार हे शिवानंद शेट्टी आहे. तसेच शिवा शेट्टी यांची या प्रभागात उत्तम पकड आहे. त्यामुळे प्रभाग खुला आणि उमेदवार असताना भाजपाने श्वेता कोरगावकर यांना भाजपात प्रवेश का दिला असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरगावकर यांना उमेदवारी दिल्यास शिवानंद शेट्टी यांचे पुनर्वसन करणार कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे . मात्र, चारपैंकी केवळ एकाच उमेदवाराच्या पत्नीचा उमेदवारीचा मार्ग सुटला जात असून उर्वरीत नगरसेवकांच्या प्रभागांचा प्रश्न भाजपाचा कसा सोडवणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

आताची सर्वांत मोठी बातमी: ३३ वर्षानंतर सेबीकडून स्टॉक ब्रोकर कायद्यात प्रथमच फेरबदल! आता ब्रोकर कायदा १९९२ ऐवजी २०२६ लागू होणार!

मोहित सोमण:आज सेबी (Security Exchange Board of India SEBI) नियामक मंडळानी भांडवली बाजारातील कारभार सुव्यवस्थित करण्यासाठी नवा निर्णय

पोलिसांना चवकण्यासाठी चोरांनी लढवली अजब शक्कल...

नवी मुंबई : चोरी केल्यानंतर पोलिसांचा तपास चुकवण्यासाठी गुन्हेगार कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे धक्कादायक

चांदीची 'घसरगुंडी' थेट ४% इंट्राडे कोसळले 'या' कारणामुळे वाचा आजचे दर

मोहित सोमण: या आर्थिक वर्षातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) या निर्देशांकातील नव्या पुनर्संतुलन (Rebalancing) प्रकियेसह आगामी

अंबरनाथ मध्ये काँग्रेसला धक्का १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेतील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी आज नवी मुंबई येथे भाजप मध्ये प्रवेश केला.

भारतीय इक्विटी बाजाराची २०२६ मध्ये मजबूत देशांतर्गत पायावर सुरुवात, 'मजबूत पाया, पण कळस नाही'- मोतीलाल ओसवाल

मोहित सोमण: मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (MOFSL) ने आपला नवा इक्विटी बाजाराशी संबंधित 'Full Strategy 3QFY26

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलांना