Stock Market Closing Bell: आठवड्याच्या अखेरच्या सत्रात बाजारातील स्थिरतेची 'शाश्वती' प्राप्त,सेन्सेक्स ४४७.५५ व निफ्टी १५०.८५ अंकाने उसळला!

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रातही वाढ कायम राहिली आहे. जागतिक सकारात्मक संकेतामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील खरेदी वाढवत बाजाराला झुकते कौल दिले. परिणामी शेअर बाजारात सेन्सेक्स ४४७.५५ अंकांने उसळत ८४९२९.३६ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ५० हा १५०.८५ अंकाने उसळत २५९६६.४० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अखेरच्या सत्रातही विशेष वाढ झाली नसली तरी मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे बाजाराला सपोर्ट लेवल मिळाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात मिडकॅप १०० (१.२०%), मिडकॅप १५० (१.१६%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ ऑटो (१.२३%), निफ्टी फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.५७%), रिअल्टी (१.६७%), हेल्थकेअर (१.०९%) निर्देशांकात वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रातील अस्थिरता निर्देशांक (VIX) हा ०.४०% पातळीवर सुरु असताना अखेरच्या टप्प्यात १.९०% ने घसरल्याने बाजाराला स्थैर्य प्राप्त झाले आहे.


युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीनंतर अनपेक्षितपणे ग्राहक किंमत निर्देशांकात झालेल्या घसरणीचा फायदा बाजारात झाला असून आशियाई बाजारातील बँक ऑफ जपानने वाढलेल्या महागाईमुळे व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने वाढ करण्याचा निर्णय घेतला. गुंतवणूकदारांनी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आशियाई बाजार अखेरच्या सत्रातही तेजीत होते. आज अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील सर्वाधिक वाढ गिफ्ट निफ्टी (०.६१%) सह निकेयी १.१९%, हेंगसेंग (०.८२%), कोसपी (०.६२%) निर्देशांकात वाढ झाली असून जकार्ता कंपोझिट (०.१०%), स्ट्रेट टाईम्स (०.०२%) निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही बाजारात वाढ झाल्याने कालची रॅली आजही कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. डाऊ जोन्स (०.३०%), एस अँड पी ५०० (०.९३%), नासडाक (१.३७%) तिन्ही बाजारात मोठी वाढ सुरूवातीला झाली. आज भारतीय बाजारातील ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही चांगली वाढ झाली आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ओला इलेक्ट्रिक (९.९८%), टाटा इलेक्सी (७.९८%),औथम इन्व्हेस (७.६३%), आयटीआय (१.६१%), मदर्सन वायरिंग (६.१२%), एथर एनर्जी (५.९०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण डॉ लाल पॅथलाब्स (५०.१९%), एबी लाईफस्टाईल (४.९९%), ब्लू स्टार (३.९५%), सिमेन्स इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (३.२५%), किर्लोस्कर ऑईल (३.१६%), बलरामपूर चिनी (२.९१%), अदानी टोटल गॅस (२.२७%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना, जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकेच्या सीपीआयने अंदाज कमी केल्याने जागतिक शेअर बाजारांमध्ये तेजी आली, त्यामुळे शटडाऊन दरम्यान डेटा विश्वासार्हतेबद्दल चिंता असूनही फेडच्या मऊ भूमिकेच्या अपेक्षांना बळकटी मिळाली. गुंतवणूकदार आता फेडच्या २०२६ च्या सुलभीकरणाच्या मार्गावर संकेत शोधत आहेत. दरम्यान बीओजेने आपला पॉलिसी रेट २५ बीपीएसने वाढवून तीन दशकांच्या उच्चांकावर नेला, जो जागतिक तरलता ट्रेंडला आकार देऊ शकतो. स्थानिक पातळीवर, मजबूत जागतिक संकेत आणि सौदा शोधामुळे निर्देशांक उंचावले, लार्ज-कॅप स्टॉकमध्ये वाढ झाली. जास्त पुरवठ्याच्या चिंतेमुळे तेलाच्या किमती कमी होत राहिल्या आणि वाढीचा दृष्टिकोन मंदावला. भावना रचनात्मक राहिली तरी, व्यापार कराराच्या वेळेनुसार आणि आगामी मॅक्रो डेटा रिलीझवरील अनिश्चिततेमुळे जवळच्या काळात अस्थिरता कायम राहू शकते.'


बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'निफ्टीने फॉलिंग वेज पॅटर्नमधून ब्रेकआउट दिला आहे, जो बाजारातील भावना सुधारत असल्याचे दर्शवतो. याव्यतिरिक्त, निर्देशांकाने दैनंदिन चार्टवर २१-दिवसांचा ईएमए पुन्हा मिळवला आहे. ५० दिवसांच्या ईएमएजवळ (Exponential Moving Average EMA) आधार मिळाल्यानंतर, निर्देशांकाने २६००० च्या पातळीकडे उसळी घेतली. पुढे २६००० पातळी ही एक महत्त्वाची पातळी असेल. या पातळीच्या वरची निर्णायक चाल निर्देशांकाला २६३०० पातळीपर्यंत नेऊ शकते. दुसरीकडे तात्काळ आधार (Immediate Support) २५९०० पातळीवर आहे, जो निफ्टीसाठी संरक्षणाची पहिली फळी म्हणून काम करण्याची शक्यता आहे.'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'साप्ताहिक चार्टवर, निर्देशांकाने डोजी कँडलस्टिक तयार केली, जी बाजारातील सहभागींमध्ये अनिर्णयता दर्शवते. शुक्रवारच्या सत्रात, निर्देशांक पुन्हा एकदा त्याच्या १० दिवसांच्या एसएमएच्या (Simple Moving Average) वर बंद होण्यात अयशस्वी ठरला, ज्यामुळे अल्प- मुदतीची भावना सावध राहिली. आणखी काही एकत्रीकरणाची (Consolidation) सत्रे अपेक्षित आहेत, ज्यात निर्देशांक ५८८०० ते ५९५०० या पातळींदरम्यान मर्यादित श्रेणीत व्यवहार करण्याची शक्यता आहे. निर्देशांक त्याच्या अल्प-मुदतीच्या मूव्हिंग एव्हरेजेसच्या खाली राहत असल्याने बाजाराचा कल मंदीचाच आहे. ५९५०० पातळीच्या वर निर्णायक ब्रेकआउट किंवा ५८८०० पातळीच्या खाली ब्रेकडाउन पुढील दिशात्मक हालचाल निश्चित करेल. तात्काळ आधार ५८८०० पातळीवर आहे, तर प्रतिरोध (Resistance) ५९२०० आणि ५९५०० या पातळ्यांवर आहे.'

Comments
Add Comment

बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

Mumbai Port : मुंबई बंदर होणार 'प्रदूषणमुक्त'! JNPA मध्ये हायटेक सुविधा, मालवाहतूक होणार सुपरफास्ट...मुंबई बंदराने काढली पहिली निविदा

मुंबई : वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता, मुंबई बंदर प्राधिकरणाने 'हरित बंदर' (Green Port) बनण्याच्या

Mumbai Local Train Power Block : प्रवाशांनो घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासा! पनवेल, कर्जत, कल्याण मार्गावर ब्लॉकचा मोठा फटका; परिणाम कुठे होणार ?

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (समर्पित माल वाहतूक मार्ग) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग

Devendra Fadanvis : हवं तर ऑईल पेंट वापरा, पण विनाकारण...; शाईच्या वादावर फडणवीसांचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी सकाळी साडेसात