'कैरी' चित्रपटातील सायली संजीवची मध्यवर्ती भूमिका प्रत्येक स्त्रीच्या हृदयाला करणार स्पर्श

'प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो', असे नेहमीच ऐकायला मिळते. पण असे उलट वाक्य स्त्रियांच्या बाबतीत फार कमी ऐकू येते. आजही ही संख्या काही हवी तितकीशी वाढलेली पाहायला मिळत नाहीये. स्त्री स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिंमतीने काहीतरी करू पाहते असे चित्र हल्ली सर्रासपणे पाहायला मिळतं. जेव्हा त्या स्त्रीच्या पाठीशी कोणाचाच पाठिंबा नसतो अशा वेळेला ती न डगमगता, न कोलमडता अगदी स्वतः वरील विश्वासाच्या जोरावर मोठे पाऊल उचलते ही वाखाणण्याजोगी बाब आहे. असेच काहीसे ‘कैरी’ चित्रपटातील कावेरीच्या आयुष्यात घडले आहे. ज्याबद्दल काही दिवसांपासून उत्सुकता लागली आहे.


‘कैरी’ चित्रपटाच्या गाण्यांनी, ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवलीच, पण ‘कैरी’ मधील एक भाग प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा ठरणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत पाहायला मिळत असून कावेरी हे तिच्या भूमिकेचे नाव आहे. ट्रेलरमध्ये पाहायला मिळाल्याप्रमाणे कावेरीच्या आयुष्यातून तिचा नवरा दूर जातो आणि त्याच्या शोधात परक्या देशात भाषा, संस्कृतीची जाण नसताना, कोणावर विश्वास ठेवावा हे माहीत नसतानाही ही कावेरी अगदी खंबीरपणे हा लढा लढते. आता हा लढा कावेरी कसा लढणार, हा लढा नेमका कोणता आहे हे सारं काही तुम्हाला जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.



या चित्रपटात अर्थातच स्त्रीच्या धैर्याची, भीतीच्या पलीकडे जाऊन स्वतःसाठी लढण्याची आणि सन्मानानं दृढनिश्चयाने लढण्याची ही कथा असल्याचे समोर येते. चित्रपट पाहताना रहस्याचे थर उलगडत जाणार असल्याचा अंदाज तुम्हाला एव्हाना आला असेल आणि हे रहस्य अत्यंत सुंदरपणे मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. अर्थात ‘कैरी’ चित्रपटातील महिला सक्षमीकरणासाठीचा हा प्रवास एका वेगळ्याच रूपात मांडला आहे. दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या नजरेतून महिला सक्षमीकरणासाठी उचललेले हे पाऊल अर्थातच अभिमानास्पद आहे आणि सायलीने चित्रपटातील कावेरी ही भूमिका अत्यंत योग्यपणे हाताळत या भूमिकेला आणि महिलेच्या दृढनिश्चयाला न्याय मिळवून दिला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय