जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय नाही, सिंगापूर पोलिसांचा खुलासा

सिंगापूर : भारतीय नागरिक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत सिंगापूर पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत. या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या तर्कवितर्कांची दखल घेत सिंगापूर पोलिस दलाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


सिंगापूर पोलिस दलाच्या माहितीनुसार, जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सिंगापूर कोरोनर्स अ‍ॅक्ट २०१० अंतर्गत सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात कोणताही घातपात किंवा गुन्हेगारी कट आढळून आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, भारतातील माध्यमांमध्ये या प्रकरणी विशेष तपास पथकाने चार जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असले तरी सिंगापूर पोलिसांकडून सध्या कोणताही संशयास्पद प्रकार नोंदवण्यात आलेला नाही.


सिंगापूर पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल राज्य कोरोनरकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोनर इन्क्वायरी घेण्यात येणार असून ही प्रक्रिया मृत्यूचे कारण आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी असते. ही चौकशी जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार असून त्याचा निष्कर्ष सार्वजनिक केला जाणार आहे.


सिंगापूर पोलिस दलाने या प्रकरणाचा सखोल आणि व्यावसायिक पद्धतीने तपास केला जात असल्याचे नमूद करत नागरिकांना अप्रमाणित माहिती पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी साधला संवाद

मुंबई : वॉर्ड विकासासाठी सत्तेचा वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा

बदरी-केदारसह चारधाममध्ये मोबाईल बंदी ,प्रशासनाची रील आणि फोटोवर कडक नजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी

नवी मुंबईत तिरूपती देवस्थानाला ३.६ एकर भूखंड एक रुपयात

नवी मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक तिरुमला तिरूपती देवस्थानम बोर्डला नवी मुंबईत

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी...

महापालिका निवडणुकीतील यशाबद्दल ठिकठिकाणी अभिनंदन झ्युरिक :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक