ICICI Prudential AMC Share Listing Update: आयसीआयसीआय प्रुडेंशियल असेट मॅनेजमेंट कंपनीचे तुफान लिस्टिंग २०% प्रिमियमसह 'या' दरात कंपनी सूचीबद्ध

मोहित सोमण:आयसीआयसीआय प्रुडेंशियल असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (ICICI Prudential Asset Management Company AMC) आयपीओचे आज जबरदस्त लिस्टिंग झाले आहे. कंपनी २०.०९% प्रिमियमसह २६०० रूपये प्रति शेअरवर सूचीबद्ध (Listed) झाली आहे. त्यामुळे मूळ प्राईज बँड असलेल्या २१६५ रूपये प्रति शेअर तुलनेत २०% प्रिमियम दरासह शेअर २६०० रूपयांना शेअर सूचीबद्ध झाला. १२ ते १५ डिसेंबर कालावधीत आलेल्या १०६०२.६५ कोटींच्या आयपीओला ३९.१७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. एकूण पब्लिक इशूपैकी रिटेल गुंतवणूकदारांकडून २.५३ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १२४.८७ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २२.०४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यामुळेच कंपनीच्या आयपीओला मोठ्या प्रमाणात मागणी कायम होती परिणामी आयपीओची ग्रे मार्केट मधील शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) २६८५ रूपये होती. त्यामुळे थोड्याशा कमी पातळीवर बाजारात शेअर सूचीबद्ध झाला आहे.


आज १९ डिसेंबरला सूचीबद्ध झालेल्या या आयपीओत संपूर्णपणे ४.९० कोटी शेअर ओएफएस (Offer for sale OFS) विक्रीसाठी उपलब्ध होते. रिटेल गुंतवणूकदारांना किमान १२९९० रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. कंपनीने आयपीओआधीच ३०२१.७६ कोटींचा निधी अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त करण्यात आली होती. १९९३ मध्ये स्थापन झालेली आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी ही एक देशातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) कंपनी आहे.आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीकडे सक्रिय त्रैमासिक सरासरी व्यवस्थापनाधीन मालमत्ता (QAAUM) आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांची QAAUM १०१४७.६ अब्ज इतकी होती.


आर्थिक बाबतीत कंपनीला आर्थिक वर्ष २४-२५ मधील मार्चपर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर ३२% महसूल अधिक मिळाला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर २९% अधिक वाढ झाली होती.


ही कंपनी परदेशी ग्राहकांना पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS), पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) आणि सल्लागार सेवा प्रदान करते. ही कंपनी म्युच्युअल फंड उद्योगामध्ये सर्वाधिक योजनांचे व्यवस्थापन करते. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत, त्यांच्याकडे १४३ योजना आहेत, ज्यात ४४ इक्विटी आणि इक्विटी-आधारित योजना, २० डेट योजना, ६१ पॅसिव्ह योजना, १५ देशांतर्गत फंड-ऑफ-फंड योजना, एक लिक्विड योजना, एक ओव्हरनाईट योजना आणि एक आर्बिट्राज योजनेचा समावेश आहे.

Comments
Add Comment

'कैरी' चित्रपटातील सायली संजीवची मध्यवर्ती भूमिका प्रत्येक स्त्रीच्या हृदयाला करणार स्पर्श

'प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो', असे नेहमीच ऐकायला मिळते. पण असे उलट वाक्य स्त्रियांच्या बाबतीत फार कमी

आनंदाची बातमी! हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांना पुन्हा एकदा पुत्ररत्न

लोकप्रिय विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना पुन्हा एकदा पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. भारतीने आज

यंग, क्रेझी आणि फुल मजा: आमिर खान प्रोडक्शन्सची ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर प्रदर्शित!

आमिर खान प्रोडक्शन्सने आपली नवी जासूसी कॉमेडी ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ अतिशय मजेशीर आणि हटके अंदाजात जाहीर

ओटीटी पोर्टफोलिओमध्ये ‘अल्ट्रा प्ले’ आणि ‘अल्ट्रा झकास’ अॅप

भारतातील आघाडीचे ओटीटी अॅग्रीगेशन प्लॅटफॉर्म ‘टाटा प्ले बिंज’ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये ‘अल्ट्रा प्ले’ आणि

‘डिअर पँथर’ मराठी शॉर्टफिल्मची परदेशातही चर्चा

ऑस्कर नामांकित चित्रपट महोत्सवासाठी पात्र ठरलेला मराठी लघुपट ‘ डिअर पँथर ’ याची लंडन इथल्या प्रतिष्ठित लिफ्ट-ऑफ

लोक शिव्या द्यायचे तेव्हा त्रास व्हायचा : मिलिंद गवळी

मिलिंद गवळी यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच त्यांची ‘वचन दिले तू मला’ ही नवीन मालिका