1xBet प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, युवराज सिंह ते सोनू सूद यांच्या मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : ऑनलाइन सट्टेबाजीशी संबंधित 1xBet अ‍ॅप प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीत भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह, रॉबिन उथप्पा तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.


ईडीकडून करण्यात आलेल्या नव्या प्रोव्हिजनल अटॅचमेंटमध्ये युवराज सिंह, रॉबिन उथप्पा, अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद, खासदार-अभिनेत्री मिमी चक्रवर्ती, अभिनेता अंकुश हाजरा आणि अभिनेत्री नेहा शर्मा यांचा समावेश आहे.


ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये युवराज सिंह यांची सुमारे २.५ कोटी रुपये, रॉबिन उथप्पा यांची ८.२६ लाख रुपये, उर्वशी रौतेला यांची २.०२ कोटी रुपयांची मालमत्ता असून ही मालमत्ता त्यांच्या आईच्या नावावर नोंदणीकृत आहे. सोनू सूद यांची १ कोटी रुपयांची मालमत्ता, मिमी चक्रवर्ती यांची ५९ लाख रुपये, अंकुश हाजरा यांची ४७.२० लाख रुपये तर नेहा शर्मा यांची १.२६ कोटी रुपयांची मालमत्ता अटॅच करण्यात आली आहे.


ही चौकशी कथित बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्सशी संबंधित असून या अ‍ॅप्सच्या माध्यमातून गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा तसेच मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी झाल्याचा आरोप आहे.


1xBet ही जागतिक स्तरावर ओळखली जाणारी बेटिंग कंपनी असून गेल्या १८ वर्षांपासून बेटिंग इंडस्ट्रीत कार्यरत आहे. या प्लॅटफॉर्मवर हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावण्याची सुविधा उपलब्ध असून कंपनीची वेबसाइट आणि अ‍ॅप ७० भाषांमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे.


आजच्या कारवाईत ईडीने एकूण ७.९३ कोटी रुपयांच्या मालमत्ता अटॅच केल्या आहेत. याआधी या प्रकरणात शिखर धवन यांच्या ४.५५ कोटी रुपये आणि सुरेश रैना यांच्या ६.६४ कोटी रुपयांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत 1xBet प्रकरणात ईडीकडून एकूण १९.०७ कोटी रुपयांच्या मालमत्ता अटॅच करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या

अहमदाबाद टी-२०: तिलक-हार्दिकची तुफानी खेळी भारताचा दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा २३२ डोंगर

अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना आज

भारत U19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत

मुंबई : भारताच्या युवा संघाने अंडर-१९ आशिया चषक २०२५ स्पर्धेत दमदार कामगिरी सुरूच ठेवत उपांत्य फेरीत श्रीलंकेचा

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव