ब्रोकरेजने मजबूत फंडामेंटल व आर्थिक परिस्थिती व कंपनीच्या विस्तारित बाजूकडे पाहता जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज व मोतीलाल ओसवालने ६ शेअर सूचवले आहेत. जाणून घेऊयात कुठले शेअर खरेदीसाठी फायदेशीर-
१) TCS Consultancy- टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज (JMFL) बाय कॉल दिला असून ३६९० रूपये लक्ष्य किंमत (Target Price TP) शेअरसाठी आपल्या अहवालात नमूद केली आहे.
मोतीलाल ओसवालनेही टीसीएसला ३२१८ रूपये खरेदी किंमतीसह (CMP) ३७% अपसाईड प्रमाणे बाय कॉल दिला असून ४४०० रूपये प्रति लक्ष्य किंमत (Target Price TP) शेअरने गाठणे अपेक्षित आहे आहे असे ब्रोकरेजच्या अहवालाने म्हटले आहे.
२) Amber Enterprises India- अंबर एंटरप्राईजेस कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियलने बाय कॉल दिला असून ७७५० रूपये लक्ष्य किंमतीसह आपल्या पोर्टफोलिओत शेअर जोडण्याचा (Add) सल्ला कायम ठेवला आहे.
३) Crompton Greaves Consumer Eletectricals- क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंज्यूमर इलेक्ट्रिकल कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला मोतीलाल ओसवाल फायनांंशियल सर्विसेस या ब्रोकरेजने दिला असून २४९ रूपये सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, ४०% अपसाईड (वाढीसह) शेअर ३५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत म्हणून (Target Price TP) लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
४) Lodha Developes- मोतीलाल ओसवालनेच लोढा डेव्हलपर्स लिमिटेड शेअरला बाय कॉल दिला असून १०६४ रूपये सामान्य खरेदी किंमतीसह ७७% अपसाईडसह शेअर १८८८ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीवर अपेक्षित आहे असे ब्रोकरेजने आपल्या अहवालात म्हटले आहे.
५) Godrej Consumer- गोदरेज कंज्यूमर ड्युरेबल्स शेअरला मोतीलाल ओसवालने बाय कॉल दिला असून ११८० रूपये प्रति शेअर खरेदी किंमतीसह २३% शेअर अपसाईड अपेक्षित आहे असे म्हटले आहे. त्यामुळे ब्रोकरेजने लक्ष्य किंमत १४५० रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.
६) VRL Logistics- वीआरएल लॉजिस्टिक्स लिमिटेडला मोतीलाल ओसवालनेच बाय कॉल दिला असून २६६ रूपये प्रति शेअर खरेदी किंमत निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या अहवालात शेअर ३२% अपसाईड जाऊ शकतो असे म्हटले असून लक्ष्य किंमत ३५० रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.