पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही मोर्चा काढणारच!

मराठी अभ्यास केंद्रासह विविध शैक्षणिक संघटनांचा आज मोर्चा


मुंबई : मराठी शाळांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात मराठी अभ्यास केंद्राने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी शाळांचा मुद्दा राज्याच्या पटलावर यावा, तसेच त्यातून मराठी शाळांविषयी सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी गुरुवार, १८ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेने घेतला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही संघटना आपल्या भूमिकेवर ठाम असून पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी संघटनेने केली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालय परिसरात गुरुवारी तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.


मराठी अभ्यास केंद्रातर्फे रविवार, १४ डिसेंबर रोजी दादरच्या राजर्षी शाहू सभागृह येथे ‘ठरवून बंद पाडलेल्या/पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद’ आयोजित केली होती. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, संघटना, पालक, अभ्यासक आदी या परिषदेत सहभागी झाले होते. त्यावेळी झालेल्या विचारमंथनातून मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मोर्चाची माहिती माता रमाबाई आआंबेडकर नगर पोलीस ठाणे आणि आझाद मैदान पोलीस ठाण्याला देण्यात आली. मात्र, भारतीय दंडसंहिता कलम १६८ चा आधार घेवून दोन्ही ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच मोर्चाला परवानगी नाकारली. परवानगी नसताना मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.


मात्र, मराठी अभ्यास केंद्र मोर्चाच्या निर्णयावर ठाम असून गुरुवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ठरवून बंद पाडलेल्या आणि पाडल्या जाणाऱ्या पालिकेच्या मराठी शाळांबद्दलची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि संबंधितांना वेळोवेळी दिली आहे. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने मोर्चाचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. आयुक्तांची भेट होत नाही तोवर महापालिकेच्या परिसरात आम्ही बसून राहणार असल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. हा मोर्चा शांतपणे, सनदशीर मार्गाने काढण्यात येणार असून मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, तसेच मराठी माध्यमाच्या शाळाच राहिल्या नाहीत, तर अन्य माध्यमांच्या शाळाही राहणार नाहीत. त्यामुळे अमराठी भाषकांनीही मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


विविध राजकीय व शैक्षणिक संघटनांचा पाठिंबा


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, धर्मराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी राजकीय पक्षांसह महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, मराठी एकीकरण समिती, मुंबई मराठी अध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अन्याय निवारण सेवा संघ आदी विविध शैक्षणिक संघनांनाही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

Comments
Add Comment

लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबातील चौघांवर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित

नवी दिल्ली : दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव,

चि व चि. सौ. का”ची हिट जोडी मराठी - जपानी रोमँटिक चित्रपटात

मुंबई : मानाच्या २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF), “तो, ती आणि फुजी”ची अधिकृत निवड झाली असून, या

पुण्यात हत्याकांड; मित्र झाला वैरी, धारदार शस्त्र आणि दगडाने केली हत्या

पुणे : पुण्यात मित्रच निघाले पक्के वैरी... मित्रांनीच दुसऱ्या मित्राला मारहाण करत जीवानिशी मारल्याची धक्कादायक

Delhi Airport Drug News:"विमानातून घेऊन जात होते ४३ कोटींचा गांजा" पोलींसांनी विमानतळावरच...

नवी दिल्ली: इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) एयरपोर्टवर कस्टम विभागाने ४३ करोड़ो रुपयांच्या नशेच्या पदार्थां गांजा और

रात्री उशिरा महिलेने केली ऑर्डर, Blinkit Delivery Boy ला जे आढळले, ते पाहून थरकाप उडेल

तामिळनाडू : तामिळनाडूमधील घटनेवरुन समजते की माणुसकी अजून जिवंत आहे...Blinkit च्या एका डिलिव्हरी बॅायला रात्री एक

बॉग बॉस मराठी घरातील पहिली स्पर्धक आली समोर ; ग्लॅमरस अंदाजात झळकली अभिनेत्री

Big Boss Marathi 6 : सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'बिग बॉस मराठीचे स्पर्धक कोणकोण असणार आहेत. मराठी