ठेकेदाराला हलगर्जीपणा नडला, रंगकाम करताना कोसळून मजूराचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यात कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे. सहकारनगर परिसरातील एका बंगल्यात रंगकाम करत असताना उंचावरून तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालाची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मजुरांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याचा ठपका ठेवत सहकारनगर पोलिसांनी संबंधित ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर थेट मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणावरून मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



नेमकी घटना काय?


पुण्याच्या सहकारनगर येथील गणेशदत्त सोसायटीमधील एका बंगल्यात सध्या नूतनीकरणाचे आणि रंगकामाचे काम सुरू आहे. यासाठी दीपक गुप्ता आणि दीनानाथ मेणक चौधरी या मजुरांना ठेकेदारांनी कामासाठी नेमले होते. दरम्यान रंगकाम करताना दोन्ही मजूरांचा तोल गेला आणि ते उंचावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत दीपक गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीनानाथ चौधरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या प्रकरणी मुन्ना जोखुप्रसाद गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी कंत्राटदार अफसर शेख आणि क्रांतीलाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरांना उंचावर काम करताना आवश्यक असणारे सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा सुरक्षित मचान पुरवण्यात आले नव्हते. मजुरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती असतानाही त्यांना काम करायला लावल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.




कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पूर्णतः ठेकेदाराची असते. या घटनेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. खाजगी बंगले किंवा इमारतींच्या कामात अनेकदा मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे अशा जीवघेण्या घटना घडतात. या घटनेमुळे कामगार वर्गात संताप व्यक्त होत असून, कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षा ऑडिट करणे किती गरजेचे आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण

धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव

सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली

बुलढाण्यात लाडकी बहीण योजेनचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका; सरकारची कडक कारवाई

बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा

पुणेकरांचा बोपदेव घाट वाहतुकीसाठी ७ दिवस बंद; वाहतुकीत होणार 'हे' बदल

पुणे : पुण्यातील वाहतुकीत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील पुणे - सासवड ला जोडणारा बोपदेव

इम्तियाज जलील यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांचा हल्ला

काळे झेंडे दाखवत नाराजांचा राडा छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून