सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे व्यवहार करताना अनेक वेळा सुट्या पैशांची चणचण भासत होती. सुट्या पैशांची मागणी सर्रास होत होती. त्यात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटां नाहीत असचं सांगितलं जात होतं. त्यामुळे खरोखर देशात या नोटांचा तुटवडा किंवा चणचण आहे का असा खरा प्रश्न होता. या चर्चांना आता केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. बाजारपेठेत कमी मूल्याच्या नोटांची कोणतीही कमतरता नसल्याचे सरकारने मंगळवारी राज्यसभेत स्पष्ट केले आहे.


केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत माहिती दिली की, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) नोटांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. चालू आर्थिक वर्षात २६ फेब्रुवारीपर्यंत १० रुपयांच्या ४३९.४० कोटी नोटा, २० रुपयांच्या १९३.७० कोटी आणि ५० रुपयांच्या १३०.३० कोटी नोटा वितरित करण्यात आल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात (२०२५) हा आकडा १० रुपयांच्या १८० कोटी, २० रुपयांच्या १५० कोटी आणि ५० रुपयांच्या ३०० कोटी नोटा इतका होता. अशी माहिती त्यांनी राज्यसभेत दिली.


कमी मूल्याच्या नोटा परंपरेने एटीएमद्वारे दिल्या जात नाहीत, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. मात्र, या नोटांच्या सुलभ वितरणासाठी एका 'पायलट प्रोजेक्ट'ची सुरुवात करण्यात आली असून, याद्वारे छोट्या मूल्यवर्गाच्या वितरकांकडून या नोटा जनतेपर्यंत पोहोचवल्या जात आहेत असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे या नोटांचा चलनात तुटवडा असल्याची बाब फेटाळून लावण्यात आली आहे. शिवाय त्या मुबलक प्रमाणात चलनात आहे हे स्पष्ट करण्यात आलं आहे.


नोटांसोबतच नाणी आणि डिजिटल पेमेंटमुळे दैनंदिन व्यवहारांची गरज पूर्ण होत आहे. रुपे केसीसी कार्डच्या माध्यमातून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३.७२ लाख डिजिटल व्यवहार झाले आहेत. त्यांची किंमत १११.१ कोटी रुपये इतकी आहे. लहान नोटा सहसा एटीएममध्ये उपलब्ध नसतात. ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने एक नवा प्रयोग (पायलट प्रोजेक्ट) हाती घेतला आहे. यामुळे छोट्या वितरकांमार्फत या नोटा थेट लोकांपर्यंत पोहोचतील. तसेच, वाढत्या डिजिटल पेमेंटमुळेही रोख रकमेवरील अवलंबित्व कमी झाल्याचे मंत्र्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा