सौदी अरेबियाने हाकलून दिले ५६ हजार पाकिस्तानी भिकारी


रियाध : तेलाच्या विहिरी तसेच मक्का आणि मदिना यामुळे इस्लाम धर्मियांमध्ये प्रचंड महत्त्व असलेल्या सौदी अरेबिया या देशाने मोठी कारवाई केली. या कारवाईअंतर्गत सौदी अरेबियाने त्यांच्या देशात बेकायदा वास्तव्य करत भीक मागत असलेल्या ५६ हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांना देशातून हाकलून दिले. सौदीच्या शाही सुरक्षा पथकांनी पाकिस्तानी भिकाऱ्यांना विमानात बसवून पाकिस्तानला पाठवून दिले. पाकिस्तानमध्ये पाठवण्याआधी सौदीने भिकाऱ्यांचे फोटो काढून त्यांची रितसर नोंद केली. या भिकाऱ्यांना सौदीत पुन्हा भीक मागण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.


एका अहवालानुसार पाकिस्तानचे भिकारी परदेशात भिकेच्या स्वरुपात दरवर्षी ४२ अब्ज रुपयांची कमाई करतात. पण हे भिकारी संबंधित देशातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे इतका त्रास देतात की संबंधित देशाचे सरकार काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी भिकाऱ्यांना जबरदस्तीने पाकिस्तानमध्ये पाठवून देते. हे प्रकार वारंवार होत असले तरी दरवर्षी बनावट कागदपत्रे दाखवून हजारो पाकिस्तानी भिकारी भीक मागण्यासाठी सौदी अरेबियासह विविध आखाती देशांमध्ये प्रवेश करतात. यामुळे पाकिस्तानी भिकारी ही आखाती देशांसाठी एक नवी गंभीर समस्या झाली आहे. सौदी अरेबिया, यूएई, ओमान हे देश तर पाकिस्तानच्या भिकाऱ्यांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत.


Comments
Add Comment

सौदी अरेबियामध्ये एका वर्षात ३४० लोकांना फाशी देण्यात आली

सौदी अरेबियाने या वर्षी आतापर्यंत ३४० लोकांना मृत्युदंड दिला आहे.ही संख्या गेल्या वर्षीच्या ३३८ च्या विक्रमाला

भर संसदेत महिला खासदार एकमेकींशी भिडल्या...

मेक्सिकोतील संसदेत हाणामारी झाली आहे.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे

ऑस्ट्रेलिया : सिडनीत हनुक्का उत्सवादरम्यान गोळीबार, १० जणांचा मृत्यू

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बोंडी बीचवर (समुद्रकिनारा) ज्यू नागरिक हनुक्का उत्सव साजरा करत असताना दोन

आसाममध्ये माजी हवाई दल अधिकारी कुलेंद्र सरमाला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश गुवाहाटी : पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी हेरगिरी

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात