भयानक हत्याकांड; जौनपूरमध्ये मुलानेच आई-वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. जाफराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील अहमदपूर गावात अंबेश कुमार या तरुणाने आपली आई बबिता (६०) आणि वडील श्यामलाल (६२) यांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर आरोपीने दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी नदीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


पोलिसांच्या चौकशीत अंबेश कुमारने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने प्रथम आईची हत्या केल्यानंतर वडिलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील श्यामलाल हे रेल्वेचे निवृत्त लोको पायलट होते. ८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अंबेश आणि त्याच्या वडिलांमध्ये पैशाच्या कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादातूनच अंबेशने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


हत्येनंतर आरोपीने मृतदेहांचे तुकडे सहा पोत्यांमध्ये भरून ते आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवले. घरातील रक्ताचे डाग साफ करून आणि कपडे धुऊन त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तो गाडीतून निघून गेला. वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे गोमती नदीच्या बेलाव घाटावर फेकण्यात आले, तर आईच्या मृतदेहाचे तुकडे जलालापूर परिसरातील साई नदीत टाकण्यात आले. नदीत मृतदेहाचे अवयव आढळल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.


पोलिस तपासात कौटुंबिक वादाचा आणखी एक धागा समोर आला आहे. लॉकडाऊन काळात अंबेश कुमारने कोलकातामधील सहजिया नावाच्या महिलेशी विवाह केला होता. ती कोलकातामध्ये ब्युटी पार्लर चालवते. मात्र कुटुंबीय या विवाहास विरोध करत होते आणि अंबेशवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकत होते. घटस्फोटासाठी पैशांच्या मागणीवरून घरात सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने जौनपूरसह संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडवून दिली आहे.

Comments
Add Comment

भारतात अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी

नवी दिल्ली : भारतात अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळाली

‘व्हीबी-जी राम-जी’ लोकसभेत मंजूर, विरोधकांनी मंत्री शिवराजसिंह चौहानांच्या अंगावर फेकले कागद

नवी दिल्ली : देशातील ग्रामीण जनतेला दोन दशके रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी

भाजप आमदार राम कदमांनी पाच वर्षांनी कापले केस, कारण जाणून घ्याल तर चक्रावून जाल

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी तब्बल पाच वर्षांनंतर

...म्हणून टीव्ही अभिनेत्यावर झाला हल्ला, डोक्यात मारला दंडुका

मुंबई : टीव्ही अभिनेता अनुज सचदेवावर त्याच्याच सोसायटीच्या आवारात पाठीमागून येऊन डोक्यात दंडुका मारण्याचा

पंजाबमध्ये निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर गोळीबार, आप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

पंजाबमधील ब्लॉक कमिटी निवडणुकीत 'आप'ला मोठे यश मिळाले. पण या विजयाच्या आनंदाला हिंसेचे गालबोट लागले. आम आदमी

महसूलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित

मुंबई : महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने आपल्या प्रलंबित आर्थिक आणि सेवाविषयक