FSSAI संस्थेचे राज्यांना अन्न भेसळीविरोधी युद्धपातळीवर निर्देश,धाडसत्र सुरु होणार!

मुंबई: मोठ्या प्रमाणात अन्नातील घातक पदार्थाची भेसळ सुरू असताना सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या अन्न विभागाची सर्वोच्च अधिकार असलेली संस्था फूड सेफ्टी अथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI) संस्थेने प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांना संपूर्ण राज्यभरात धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. संबंधित सरकारी विभाग व पथकांना 'स्पेशल ड्राईव्ह' या मोहिमेअंतर्गत अशा संशयी व अस्वच्छ विघातक अथवा भेसळयुक्त पदार्थ विक्रेते, भेसळ दूध विक्री करणाऱ्यावर छापा टाकण्याचे निर्देश (Directives) दिले असून मोठ्या प्रमाणात सरकारकडून हे 'क्रॅकडाऊन' असणार आहे. प्रसारमाध्यमांना सुत्रांनी संबंधित माहिती दिली असून लवकरच या ऑपरेशनला सुरुवात होणार आहे.


इतकेच तर संस्थेने फूड सेफ्टी कंप्लायन्स सिस्टिम (FOSCOS) या प्रणाली अंतर्गत वेळोवेळी बदल लागू करुन त्यांचे रिपोर्टिंग संस्थेला करण्याचे निर्देश दिले. या प्रणालीअंतर्गत वेळोवेळी भेसळ संबंधित बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जाऊन रियल टाईम बेसिसवर त्याचा अहवाल विभागाकडे सादर केला जाईल. यासह विविध राज्यराज्यातील अन्न सुरक्षा व पुरवठा याविषयी सहकार्य वाढवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. २००६ साली झालेल्या अन्न सुरक्षा व मानक कायदा (Food and Safety Standards Act 2006) अंतर्गत ग्राहकांच्या हिताचे रक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. खासकरून यातील उपायोजना त्वरीत लागू करत प्रभावी अंमलबजावणी या कायद्याची केली जाणार आहे अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.


अलीकडेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतील सणासुदीच्या काळात दुग्धजन्य पदार्थांच्या खपात वाढ होत असल्याने भेसळ रोखण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संस्था (FSSAI)ने विशेष पाळत आणि अंमलबजावणी मोहीम जाहीर केली होती. संस्थेने अधिकाऱ्यांना आता संवेदनशील ठिकाणांवर आणि महत्त्वाच्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीही'फूड सेफ्टी ऑन व्हील्स' (FSWs) या फिरत्या अन्न-चाचणी प्रयोगशाळा प्रमुख बाजारपेठांमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या.

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम