क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार!

जिल्हा न्यायालयाकडून दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा


नाशिक : राज्याचे क्रीडा मंत्री आरोपी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी सुनावली.


शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एम.बदर यांनी अतिरक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रूपाली नरवाडीया यांना दिले आहेत. यामुळे त्यांच्या न्यायालयाकडून आरोपी माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना कधीही अटकेचे समन्स बजावले जाऊ शकते. सदनिका घोटाळा कोकाटे बंधूंना अखेर भोवला.


मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या १० टक्के राखीव कोट्यातून नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरसारख्या ठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये बनावट कागदपत्रांच्याअधारे फसवणूक करून चार सदनिका हडपल्याच्या आरोपाखाली कोकाटे बंधूंविरुद्ध खटला सुरू होता.


नेमकं प्रकरण काय?


१९९५ मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार व फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण १९९७ पासून सुरू होते. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. या प्रकरणी आता कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात बिबट्यांची दहशत

येऊर, वारली पाड्यात दोन श्वानांवर हल्ला ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आदिवासी पाड्यांमध्ये

बंड शमले, अपक्ष वाढवणार ताप

ठाणे पालिका निवडणुकीत ८६ अपक्ष उमेदवार मैदानात ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील

अर्ज माघारी, बिनविरोध निवडीचे नाट्य संपले

ठाण्यात ६४९ उमेदवार रिंगणात, ७ बिनविरोध ठाणे : अंतिम क्षणापर्यंत ताणलेले जागावाटप, ऐनवेळी मिळालेले एबी फॉर्म,

मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीसाठी भाजपचे १३ उच्चशिक्षित युवा

डॉक्टर, यांचा समावेश भाईंदर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना संधी देण्याबाबत दिलेल्या

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने