मोहित सोमण: नेफ्रोकेअर हेल्थ सर्विसेस (Nephrocare Health Services Limited) कंपनी आज शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) झाली आहे. ८७१.३९ कोटी बूक व्हॅल्यु असलेल्या आयपीओचे आज ८.७०% प्रिमियमसह अनपेक्षितपणे दमदार लिस्टिंग झाले आहे. प्रति शेअर मूळ प्राईज बँड असलेल्या ४६० बदली प्रति शेअर ४९० रूपयांला सूचीबद्ध झाला आहे. कंपनीच्या आयपीओची शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ८.०४% अधिक प्रिमियम होती. त्याहून अधिक चांगला प्रतिसाद मिळाल्याने शेअरचे यशस्वी लिस्टिंग झाले आहे. १० ते १२ डिसेंबर दरम्यान हा आयपीओ बाजारात दाखल झाला होता. १५ डिसेंबरला आयपीओचे वाटप (Allotment) पात्र गुंतवणूकदारांना निश्चित करण्यात आले होते. आज १७ डिसेंबरला शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) करण्यात आलेला आहे. आयपीओपूर्वी कंपनीने २६०.२६ कोटी रूपये अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केले होते.
कंपनीला एकूण १४.०८ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. पब्लिक इशूपैकी २.३६ वेळा रिटेल गुंतवणूकदारांकडून, २६.८२ पटीने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, २४.७७ पटीने विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले. एकूण आयपीओतील ३५३.७५ कोटी रुपयांचा फ्रेश इशू असून उर्वरित ५१७.६४ कोटी मूल्यांकनांचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) साठी उपलब्ध होते.
२०१० मध्ये स्थापन झालेली नेफ्रोकेअर हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड ही हेल्थकेअर कंपनी असून कंपनी भारत आणि निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील क्लिनिक्सच्या विस्तृत जाळ्याद्वारे संपूर्ण डायलिसिस सेवा प्रदान करते. ही कंपनी निदान, हेमोडायलिसिस, घरगुती आणि मोबाईल डायलिसिस, आणि आरोग्य कार्यक्रम यांसारख्या सेवा देते. उपलब्ध माहितीनुसार, ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत, नेफ्रोकेअरची ५१९ क्लिनिक्स कार्यरत होती. त्यापैकी ५१ क्लिनिक्स फिलिपाइन्स, उझबेकिस्तान आणि नेपाळमध्ये होती. यामध्ये उझबेकिस्तानमधील जगातील सर्वात मोठ्या डायलिसिस क्लिनिकचा समावेश आहे. भारतात, कंपनीची २१ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमधील २८८ शहरांमध्ये उपस्थिती होती. एकूण क्लिनिकपैकी सुमारे ७७.५३% क्लिनिक्स टियर २आणि टियर ३ शहरांमध्ये होती.
विक्रम वुपला, बेसेमर व्हेंचर पार्टनर्स ट्रस्ट, एडोरास इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स पीटीई. लिमिटेड, हेल्थकेअर पॅरेंट लिमिटेड, इन्व्हेस्टकॉर्प प्रायव्हेट इक्विटी फंड II (2) आणि इन्व्हेस्टकॉर्प ग्रोथ अपॉर्च्युनिटी फंड हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आर्थिक बाजू पाहिल्यास, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ३४% वाढ आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये झाली असून करोत्तर नफ्यात (PAT) ९१% वाढला आहे. तिमाही बेसिसवर (QoQ), मार्च २०२५ मधील ७६९.९२ कोटींच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात ४८३.९७ कोटींवर घसरण झाली. कंपनीच्या करोत्तर नफ्यात तिमाही बेसिसवर ६७.१० कोटीवरुन १४.२३ कोटींवर घसरण झाली आहे. ईबीटाही तिमाही बेसिसवर घसरला असून मार्च तिमाहीतील १६६.६४ कोटी तुलनेत सप्टेंबर तिमाहीत ११०.३१ कोटींवर घसरला आहे.