नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू


नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने सिडकोने विमानतळावर तिसरी समांतर धावपट्टी उभारण्याच्या दृष्टीने सविस्तर तांत्रिक व व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी पात्र व नामांकित एकल संस्था अथवा संयुक्त भागीदार संस्थांकडून निविदा जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


सिडको प्रशासनाकडून या माध्यमातून भविष्यातील प्रवासी व माल वाहतुकीचा अंदाज, पायाभूत सुविधांची गरज, आर्थिक व्यवहार्यता, पर्यावरणीय बाबी तसेच दीर्घकालीन विमान वाहतूक मागणी लक्षात घेऊन तिसऱ्या धावपट्टीची आवश्यकता आणि उपयुक्तता तपासली जाणार आहे. दरम्यान, २०३७ नंतरच्या दीर्घकालीन विमान वाहतूक मागणीचा विचार करता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारण्याचा पर्याय सध्या तपासण्यात येत आहे. सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रफळावर विकसित होत असलेला हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन माल वाहतूक हाताळण्यासाठीच्या क्षमतेचा आहे.


या विमानतळाची रचना दोन समांतर व स्वतंत्र धावपट्ट्यांसह करण्यात आली असून, चार परस्पर जोडलेल्या प्रवासी टर्मिनल्सचा यामध्ये समावेश आहे. त्यातच नवी मुंबई विमानतळाचा विकास पाच टप्प्यांत केला जात असून, पहिला व दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे.


या विमानतळाहून देशांतर्गत विमानसेवा २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या धावपट्टीचा अभ्यास हा राज्यातील विमान वाहतूक क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, मुंबई महानगर प्रदेशाच्या वाढत्या आर्थिक व औद्योगिक गरजांना चालना देणारा ठरणार आहे.


"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने सिडकोने घेतलेला हा निर्णय सिडकोच्या दूरदृष्टीपूर्ण पायाभूत सुविधा नियोजनाची साक्ष देणारा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा परिसराच्या दीर्घकालीन विकासाच्या गरजांनुसार सातत्याने विकसित होत राहील, याची खात्री करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवर आज - उद्या 'मेजर ब्लॉक'

लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल मुंबई  : पश्चिम रेल्वेवर परिचालन कार्य आणि प्रभादेवी रोड ओव्हर

गॅसनंतर आता 'पाणी'ही महाग?

बाटलीबंद पाण्याच्या दरात घाऊक बाजारात वाढ मुंबई  : इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. एखाद्या शाळेत मराठी शाळा शिकवली

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या