ठाण्यात शुक्रवारपर्यंत पाणीकपात

कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू


ठाणे  : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १००० मि.मी. व्यासाची जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक ११ डिसेंबर रोजी नादुरूस्त झाली होती, ही जलवाहिनी दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे, परंतु या कामासाठी आणखी ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात शुक्रवारपर्यंत ५० टक्के पाणीकपात लागू करण्यात येत आहे.


पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने व जलदगतीने करण्यात येत आहे. मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी उशीर होत असून हे काम पूर्ण होण्यास अजून ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.


परिणामी, ठाण्यातील पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी शुक्रवारपर्यंत प्रत्येक भागात दिवसातून १२ तास झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले.

Comments
Add Comment

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

अशोक शिंदे बनले मनोवैज्ञानिक

अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता

जेमिमाला दिलेलं वचन सुनील गावस्कर यांनी पाळलं

मुंबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी दिलेले एक खास वचन अखेर पूर्ण झाले आहे. भारतीय संघाने विश्वचषक

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी