यंदा २१ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस !

दिवस फक्त १० तास, ४७ मिनिटांचा राहणार


अमरावती : वैज्ञानिक आणि खगोलीय घटनांबद्दल सर्वसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल आणि उत्सुकता असते. पृथ्वीवर प्रकाश पसरवणारा सूर्य वर्षातील एका दिवशी अत्यंत कमी वेळ दर्शन देत असतो. या दिवशी पृथ्वीशी संबंधित अशी खगोलीय घटना घडत असते की, त्या दिवशी सूर्य लवकर मावळत असतो, त्यामुळे रात्र फार मोठी असते. यंदा २१ डिसेंबरला वर्षातील सर्वात लहान दिवस राहणार आहे.


२१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहील. या बिंदूला ‘विंटर सोल्स्टाईस’ असे म्हणतात. सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. ‘सूर्य स्थिर आहे’ असा त्याचा अर्थ होतो. भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत जातो. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. २१ डिसेंबरचा दिवस हा १० तास, ४७ मिनिटांचा राहील. या दिवसांत दरवर्षाला एक दिवसाचा फरक पडू शकतो. दिवस व रात्रीचा कालावधी कमीजास्त होणे आपण नेहमीच अनुभवत असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडत असते. व याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायन सुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकते. सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी २१ डिसेंबर या सर्वात लहान दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व या १० तास ४७ मिनिटांच्या सर्वात लहान दिवसाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी केले आहे. पृथ्वीवरील ऋतू सुद्धा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदन बिंदू आहेत. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो याला ‘वसंत संपात बिंदू’ असे म्हणतात. तर त्याचे विरुद्ध बिंदूत २३ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो याला ‘शरद संपात बिंदू’ असे म्हणतात. या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. २१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. या दिवसाला ‘हिवाळा अयन दिवस’ असे सुद्धा म्हणतात.

Comments
Add Comment

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

वकिलाकडून थुंकीने पान उलटण्यावर न्यायाधीशांचा आक्षेप

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अमृता सिन्हा यांनी एका वकिलाने थुंकी लावून पान उलटण्यावर

अहमदाबादच्या भक्तांकडून साईचरणी सोन्याची गणेश मूर्ती

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी

भारतीय रेल्वेने ११ वर्षांत तयार केले ४२ हजारांहून अधिक एलएचबी कोच

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ११ वर्षांत (२०१४-२०२५) ४२,६०० हून अधिक एलएचबी कोच (लिंके हॉफमन बुश) तयार केले