वकिलाकडून थुंकीने पान उलटण्यावर न्यायाधीशांचा आक्षेप

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अमृता सिन्हा यांनी एका वकिलाने थुंकी लावून पान उलटण्यावर आक्षेप घेतला आहे. न्यायालयाच्या खोलीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये एक वकील थुंकीने कागदपत्रे उलटताना दिसत आहे. न्यायमूर्ती सिन्हा यांनी हे पाहिले आणि त्यांनी लगेच त्याबाबतची नाराजी व्यक्त करत, वकिलाला हात धुण्याचे आदेश दिले आणि इशारा दिला की जर त्याने तसे केले नाही तर त्या केस ऐकणार नाहीत.


काही क्षणानंतर, वकिलाने म्हटले, "मला माफ करा." न्यायमूर्ती सिन्हा यांनी विचारले, "तुमचा बँड कुठे आहे? हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे का?"


विशेष म्हणजे, न्यायालयात प्रश्नोत्तराच्या सत्रात वकील त्यांच्या कोटांसह बँड घालतात; परंतु ते वकील बँड विसरले. त्यामुळे रागावलेल्या न्यायमूर्ती सिन्हा यांनी त्या वकिलास आधी तुमचे हात धुवा. नाहीतर, मी आता हा खटला ऐकणार नाही, असे बजावले. त्यानंतर वकील हात धुवून परत आले. त्यानंतर न्यायाधीशांनी
केस ऐकली.

Comments
Add Comment

धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

अहमदाबादच्या भक्तांकडून साईचरणी सोन्याची गणेश मूर्ती

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी

भारतीय रेल्वेने ११ वर्षांत तयार केले ४२ हजारांहून अधिक एलएचबी कोच

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ११ वर्षांत (२०१४-२०२५) ४२,६०० हून अधिक एलएचबी कोच (लिंके हॉफमन बुश) तयार केले

अवघ्या १३व्या वर्षी शाळकरी मुलांमध्ये व्यसनाची सुरुवात!

दहा शहरांतील अभ्यासातून वास्तव उघड… मुंबई  : देशातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच

मीरा रोडच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधील अमली पदार्थांचा कारखाना केला उद्ध्वस्त

१०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त भाईंदर : मीरा रोडच्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याचा तपास

ठाण्यात शुक्रवारपर्यंत पाणीकपात

कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू ठाणे  : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये