IPL मिनी लिलाव, कॅमरून ग्रीनचा २५.२० कोटींमध्ये KKRमध्ये समावेश

अबुधाबी : आयपीएल २०२६ साठी अबुधाबी येथे सुरू असलेल्या मिनी लिलावात क्रिकेटपटूंच्या खरेदीसाठी मोठमोठ्या बोली लागत आहेत. काही खेळाडूंची अद्याप विक्री झालेली नाही तर काही खेळाडूंसाठी मोठमोठ्या रकमांच्या बोली लागल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स या संघाने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमरून ग्रीन याला खरेदी केले. कॅमरून ग्रीनसाठी कोलकाता नाईट रायडर्सने २५ कोटी २० लाख रुपयांची बोली लावली. अबुधाबीत सुरू असलेल्या आयपीएल २०२६ च्या लिलावातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली आहे. या व्यवहारामुळे आयपीएल २०२६ साठीचा कॅमरून ग्रीन हा आतापर्यंतचा सर्वाधिक बोली लागलेला परदेशी क्रिकेटपटू आहे.


आयपीएलसाठी यंदा बीसीसीआयने नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला जास्तीत जास्त १८ कोटी रुपयांपर्यंत कमाई करता येणार आहे. जर एखाद्या खेळाडूसाठी जास्त रकमेची बोली लागली तर बोलीतील १८ कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम ही बीसीसीआयच्या क्रिकेटपटू प्रशिक्षण वर्गाच्या खात्यात जमा होणार आहे. नवे क्रिकेटपटू घडविण्यासाठी या निधीचा वापर होणार आहे. या नियमामुळे २५ कोटी २० लाख रुपयांची बोली लागली तरी कॅमरून ग्रीनला १८ कोटी रुपये मिळतील आणि सात कोटी २० लाख रुपये हे बीसीसीआयच्या क्रिकेटपटू प्रशिक्षण वर्गाच्या खात्यात जमा होतील. हा पैसा नवे क्रिकेटपटू घडविण्यासाठी बीसीसीआय वापरणार आहे.



आयपीएल २०२६ साठी मिनी लिलावात विक्री झालेले खेळाडू



  1. विघ्नेश पुथूर - ३० लाख - राजस्थान रॉयल्स

  2. प्रशांत सोलंकी - ३० लाख - कोलकाता नाईट रायडर्स

  3. यश राज पुंजा - ३० लाख - राजस्थान रॉयल्स

  4. सुशांत मिश्रा - ९० लाख - राजस्थान रॉयल्स

  5. नमन तिवारी - १ कोटी - लखनऊ सुपर जायंट्स

  6. कार्तिक त्यागी - ३० लाख - कोलकाता नाईट रायडर्स

  7. अशोक शर्मा - ९० लाख - गुजरात टायटन्स

  8. तेजस्वी सिंग - ३ कोटी - कोलकाता नाईट रायडर्स

  9. मुकुल चौधरी - २.६० कोटी - लखनऊ सुपर जायंट्स

  10. कार्तिक शर्मा - १४.२० कोटी - चेन्नई सुपरकिंग्स

  11. शिवंग कुमार - ३० लाख - सनरायझर्स हैदराबाद

  12. प्रशांत वीर - १४.२० कोटी - चेन्नई सुपरकिंग्स

  13. औकीब नबी दार - ८.४० कोटी - दिल्ली कॅपिटल्स

  14. अकील होसेन - २ कोटी - चेन्नई सुपरकिंग्स

  15. रवी बिश्नोई - ७.२० कोटी - राजस्थान रॉयल्स

  16. अँरिक नॉर्टजे - २ कोटी - लखनऊ सुपर जायंट्स

  17. मथीशा पाथिराणा - १८ कोटी - कोलकाता नाईट रायडर्स

  18. जेकब डफी - २ कोटी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

  19. फिन ऍलन - २ कोटी - कोलकाता नाईट रायडर्स

  20. बेन डकेट - २ कोटी - दिल्ली कॅपिटल्स

Comments
Add Comment

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

आयपीएलचा संपूर्ण लिलाव कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा