घरगुती गुंतवणूकदारांची सत्वपरीक्षा ! शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टीत घसरण 'या,' जागतिक कारणांमुळे

मोहित सोमण : आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात अपेक्षित घसरण कायम राहिली असून सेन्सेक्स ३६०.०४ अंकाने व निफ्टी १०५.५० अंकाने घसरला आहे. विशेषतः बँक निर्देशांकात झालेल्या घसरणीसह मेटल (०.७७%), प्रायव्हेट बँक (०.३२%),आयटी (०.७६%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.५७%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली असून वाढ एफएमसीजी (०.६४%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.२७%), ऑटो (०.०४%) निर्देशांकात वाढ झाली आहे. व्यापक निर्देशांकात स्मॉलकॅप ५० (०.५०%), मिडकॅप १०० (०.४१%) निर्देशांकात घसरण कायम आहे. विशेषतः आज बाजारातील अस्थिरतेचा फटका गुंतवणूकदारांना बसला असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका आज बेंचमार्क निर्देशांकातील दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.


युएस बाजारासह आशियाई बाजारातील कमकुवत सुरुवातीचा फटका भारतीय बाजारात कायम राहणार असून आजही अस्थिरतेचे सत्र म्हणून गुंतवणूकदारांना सावधगिरीचे पाऊल उचलावे लागेल असे दिसते. युएस बाजारातील एआय टेक शेअर्समध्ये मोठ्या सेल ऑफ झाल्याने व आज जाहीर होणाऱ्या पेरोल रोजगार डेटामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीचे पाऊल उचललेले दिसते. चीनच्या कमकुवत आकडेवारीचा इफेक्ट म्हणून आशियाई पॅसिफिक बाजारात आज संमिश्र कल बाजारात दिसू शकतो. दुसरीकडे काल भारतीय शेअर बाजारात जवळपास ३०० अंकाने अखेरच्या सत्रात सावरला असल्याने किरकोळ घसरणीसह बंद झाला. कालही झालेल्या रुपयांच्या घसणीसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक बाजारातून काढून घेतली.


आज आशियाई बाजारातील पहिल्या सत्रातील घसरण कालप्रमाणे आजही कायम राहिली असल्याने गिफ्ट निफ्टी (०.३५%) सह निकेयी २२५ (१.२१%), हेंगसेंग (१.९५%), शांघाई कंपोझिट (१.२२%), तैवान वेटेड (१.५०%) निर्देशांकात घसरण झाली आहे. काल युएस बाजारात डाऊ जोन्स (०.०२%) वगळता एस अँड पी ५०० (०.१६%)सह नासडाक (०.६१%) निर्देशांकात घसरण झाली आहे.


आज सुरुवातीच्या सत्रात सर्वाधिक वाढ एफएसीटी (५.५५%), टाटा टेलिकम्युनिकेशन (४.५२%), निवा बुपा हेल्थ (३.१५%), भारती हेक्साकॉम (३.०८%), सिमेन्स इंजिनिअरिंग (२.४५%), सुप्रीम इंडस्ट्रीज (२.३२%), एमआरपीएल (२.२४%),
अव्हेन्यू सुपरमार्ट (१.९७%) समभागात झाली आहे असून टीआरआयएल (४.८५%), ओला इलेक्ट्रिक (४.०१%), अँक्सिस बँक (३.७८%), इटर्नल (३.३८%), हिंदुस्थान कॉपर (२.६१%), पीबी फिनटेक (२.५४%), जेएम फायनांशियल (२.४८%), भेल (२.३२%) समभागात झाली आहे.


आजच्या सुरुवातीच्या कलावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'बाजार जवळच्या काळात एकत्रीकरणाच्या (Consolidation) स्थितीत जात आहे. घरगुती गुंतवणूकदारांनी (DII) खरेदीमुळे सतत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री सहजपणे शोषली जात असल्याने आणि आर्थिक मूलभूत घटक लक्षणीय सुधारणा दर्शवत असल्याने, बाजाराला कमकुवतपणावर आधार मिळेल. नोव्हेंबरमधील व्यापार तूट ऑक्टोबरमधील ४१.६४ अब्ज डॉलरवरून २४.५३ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाल्यामुळे रुपया देखील स्थिर होण्याची शक्यता आहे. यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांवरील (FII) विक्रीचा दबाव कमी होईल आणि पुढील घसरणीची अपेक्षा आहे.


अमेरिकेत एआयमधील व्यापार कमकुवत होत आहे. शक्यता आहे की २२०६ मध्ये कधीतरी, एआय व्यापार लक्षणीयरीत्या कमकुवत होईल ज्यामुळे भारतासारख्या EMs मध्ये भांडवल प्रवाह सुलभ होईल. तथापि, जर बाजाराला सतत ताकद दाखवायची असेल तर कमाईची पुनर्प्राप्ती आवश्यक आहे. Q3 ची आकडेवारी कमाईची पुनर्प्राप्ती कुठे होत आहे हे दर्शवेल. बँक निफ्टी मजबूत राहील.'


 
Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पडझडीचा धुमाकूळ सेन्सेक्स ५३३.६० व निफ्टी १६७.२० अंकांने घसरला

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. मिड,स्मॉल, बँक, प्रायव्हेट बँक, रिअल्टी, आयटी,

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून विमा सुधारणा विधेयक संसदेत प्रस्तावित, 'हे' दैदिप्यमान बदल अपेक्षित

मोहित सोमण:आज अखेर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमा सुधारणा विधेयक

Dollar Rupees Rate: डॉलरच्या तुलनेत रूपयाची निचांकी 'परिसिमा' ९१ रूपये प्रति डॉलर होण्याकडे वाटचाल!

मोहित सोमण: डॉलरच्या तुलनेत रुपयाची सीमा गाठली आहे. तब्बल दुपारपर्यंत प्रति डॉलर रूपया ९०.९६ पातळीवर पोहोचला

२९ महापालिकांवर महायुतीचाच भगवा फडकणार! - नवनाथ बन; मुंबई महापालिका निवडणूक ही एका कुटुंबाची शेवटची लढाई

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकास कामांच्या बळावर आधीच मारले आहे. मुंबईचा विकास