अवघ्या १३व्या वर्षी शाळकरी मुलांमध्ये व्यसनाची सुरुवात!

दहा शहरांतील अभ्यासातून वास्तव उघड…


मुंबई  : देशातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच अमली पदार्थांचे व्यसन सरासरी १३व्या वर्षीच सुरू होत असल्याची धक्कादायक माहिती एका नव्या अभ्यासातून समोर आली आहे. एम्स दिल्लीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात भारतातील १० प्रमुख शहरांतील शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश होता.अभ्यासानुसार, इयत्ता ८,९,११ व १२ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मोठ्या प्रमाणावर मुलांनी लहान वयातच व्यसनांचा अनुभव घेतल्याचे निदर्शनास आले. एकूण ५,९२० विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पदार्थांच्या वापराची सरासरी सुरुवातीची वयोमर्यादा १२.९ वर्षे असल्याचे नोंदले गेले.


विशेष म्हणजे, इंहेलंट्स (श्वसनाद्वारे घेतले जाणारे पदार्थ) वापरण्याचे वय सर्वात कमी असून ते सरासरी ११.३ वर्षे असल्याचे आढळले. त्यानंतर हेरॉइन (१२.३ वर्षे) आणि वैद्यकीय औषधांचा गैरवापर (१२.५ वर्षे) यांचा क्रम लागतो. तंबाखू आणि मद्यपान हे सर्वाधिक वापरले जाणारे पदार्थ असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधी ना कधी व्यसनांचा वापर केल्याचे मान्य केले, तर १०.३ टक्के विद्यार्थ्यांनी मागील एका वर्षात आणि ७.२ टक्के विद्यार्थ्यांनी मागील महिन्यात अशा पदार्थांचा वापर केल्याचे सांगितले.


चिंतेची बाब म्हणजे, जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी तंबाखू सहज उपलब्ध असल्याचे, तर ३६ टक्के विद्यार्थ्यांनी मद्य सहज मिळत असल्याचे नमूद केले. यामुळे अल्पवयीन मुलांपर्यंत व्यसनाधीन पदार्थ सहज पोहोचत असल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


विशेष म्हणजे ९५ टक्के विद्यार्थ्यांना व्यसन हानिकारक असल्याची जाणीव असूनही त्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून आले. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये व्यसनांचे प्रमाण अधिक असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे.


अर्थात शहरी भागात मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात धुम्रपान व मद्यपानाची सवय असल्याचे दिसून आली आहे. गंभीर बाब म्हणजे शासनाने शाळांच्या शंभर मीटर परिसरात पान तंबाखूची दुकाने असू नयेत असे आदेश काढले असले तरी पोलिसांकडूनही याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही.शालेय व महाविद्यालयीन परिसरात केवळ तंबाखूजन्य पदार्थच नव्हे तर अंमली पदार्थही उघडपणे मिळतात असे सूत्रांचे म्हणणे आहे. चरस-गांजापासून विविध अमली पदार्थ विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत असून मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाकडे वळताना दिसत आहे.


केवळ जनजागृती नव्हे तर पालक, शाळा, समाज आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांशिवाय ही समस्या आटोक्यात येणार नाही असा इशाराही अभ्यासकांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Nag Panchami 2026 : नागपंचमीला 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्ह

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी

Nashik : नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील