मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार
मुंबई: हिंदीमधील अजरामर गाण्यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांना यावर्षीचा मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार, तर सुप्रसिध्द गायिका उत्तरा केळकर यांना सन २०२५ चा मोहम्मद रफी पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज केली आहे.
आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे १९ वे वर्ष असून एक लाख रूपयांचा धनादेश स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रूपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. रफी यांच्या जयंतीनिमित्त २४ डिसेंबरला दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो.
कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात हा प्रकार उघडकीस आल्याने ...
रंगशारदामध्ये २४ डिसेंबरला वितरण
वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार असून मान्यवरांच्या हस्ते यावर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, मरणोत्तर श्रीकांत ठाकरे, अशा विविध मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे.