मोहित सोमण: दिवसभरात आज घसरणीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहाटे गिफ्ट निफ्टीत घसरण कायम राहिली असून आंतरराष्ट्रीय वातावरणात काहीसे द्वंद्व कायम असल्याने बाजारात घसरण होऊ शकते. आज ऑटो, रिअल्टी, फार्मा, आयटी कंपन्यांच्या हेवी वेट शेअरमध्ये घसरण झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांचे नुकसान झालेले दिसत आहे. सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात सेन्सेक्स ३१८.०१ अंकाने घसरला असून निफ्टी १०९.३० अंकाने घसरला आहे. सकाळच्या सत्रात बँक निर्देशांकासह विशेषतः मिडकॅप शेअर्समध्ये घसरण अधिक झाल्याने बाजारातील घसरणीचे चित्र स्पष्ट झाले. सकाळच्या सत्रात व्यापक निर्देशांकात मिडकॅप ५० (०.४१%), मिडकॅप १०० (०.३८%), मिडकॅप १५० (०.४०%) निर्देशांकात झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात वाढ केवळ मिडिया (०.४१%), मेटल (०.०१%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण ऑटो (०.९२%), एफएमसीजी (०.२१%), फार्मा (०.७४%), रिअल्टी (०.८२%) निर्देशांकात झाली आहे. विशेषतः भारतीय अस्थिरता निर्देशांक सकाळच्या सत्रात ५.४६% उसळल्याने बाजारात अस्थिरतेचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
प्रामुख्याने आज नवे ट्रिगर नसताना उलट युएस बाजारातील कालच्या घसरणीचा फटका बसल्यानंतर आता चीनच्या कमकुवत आकडेवारीसह भारतीय बाजारात सुरु असलेले सेल ऑफ या कारणामुळे बाजारात माहोल नकारात्मक दिसत आहे. काल युएस बाजारात मोठ्या प्रमाणात टेक शेअर्समध्ये सेल ऑफ झाले. उद्या युएस बाजारात पेरोल रोजगार आकडेवारीची जाहीर होणार असल्याने अस्थिरता कायम आहे. दुसरीकडे नव्या आकडेवारीनुसार चीनमध्ये किरकोळ विक्रीत घसरण झाली असून चीनमधील औद्योगिक उत्पादनात किरकोळ वाढ झाली जी अपेक्षित नव्हती. दुसरीकडे चीनमधील बेरोजगारी दर बदलला नसून जैस थे राहिला. परिणामी आशियाई बाजारातील आंतरराष्ट्रीय कारणांमुळे मरगळ कायम आहे. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात १११४ कोटी रूपयांची विक्री परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केल्याने आजही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच कमोडिटीतील किंमती, रूपयातील किंमती यांचाही परिणाम बाजारातील दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.
काल युएस बाजारात अखेरच्या सत्रात डाऊ जोन्स (०.३५%) बाजारात वाढ झाली असून नासडाक (१.७२%), एस अँड पी ५०० (१.०७%) निर्देशांकात घसरण झाली. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात आज गिफ्ट निफ्टी (०.४१%) सह बहुतांश निर्देशांकात घसरण कायम असून केवळ जकार्ता कंपोझिट (०.३१%), सेट कंपोझिट (०.०९%) मध्ये वाढ झाली आहे. सर्वाधिक घसरण कोसपी (१.५५%), निकेयी २२५ (०.५६%), तैवान वेटेड (१.०६%) निर्देशांकात झाली आहे.
आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ वोडाफोन आयडिया (९.९७%), गो डिजिटल जनरल (८.७७%), केईसी इंटरनॅशनल (४.४९%), टीबीओ टेक (३.१८%), फोर्टिस हेल्थ (२.४०%), इंटरग्लोब एव्हिऐशन (१.८४%), साई लाईफ (१.८२%), फिनोलेक्स केबल्स (१.५०%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण इन्फोऐज (४.९९%), एचडीएफसी बँक (४.५९%), आदित्य एएमसी (३.७२%), पुनावाला फायनान्स (३.६४%), ज्युब्लिअंट इनग्रेव्ह (२.५६%), महिंद्रा अँड महिंद्रा (१.९२%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१.७९%), बंधनं बँक (१.६५%),वन ९७ (१.५९%) समभागात झाली आहे.