प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या वेळापत्रकात आलेल्या प्रचंड गोंधळामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. अनेक उड्डाणांमध्ये तासनतास विलंब, अचानक रद्द होणारी उड्डाणे आणि प्रवाशांवरील वाईट वागणूक या घटनांमुळे कंपनीची प्रतिमा मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे.


या इंडिगो एअरलाईन्सच्या समस्यांमुळे संतप्त झालेले जवळपास ८२९ प्रवासी एकत्र येऊन इंडिगोविरुद्ध न्यायालयात भरपाईसाठी सामूहिक खटला दाखल करण्याची तयारी करत आहेत. या खटल्याचे नेतृत्व हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ग्राहक संरक्षण वकील डॉ. सुधीर शुक्ला करणार आहेत. शुक्ला यांनी सांगितले की, प्रवाशांना झालेल्या नुकसानीसाठी योग्य न्याय मिळावा आणि कंपनीला आपली जबाबदारी समजावी, यासाठी हा सामूहिक दावा दाखल केला जात आहे.


गेल्या काही महिन्यांपासून इंडिगोचे विमान वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अचानक विमान रद्द होणे आणि प्रवाशांना बोर्डिंगपासून वंचित ठेवणे हे नित्याच्या घटनांमध्ये रूपांतरित झाले आहे. प्रवाशांना वेळेवर आणि योग्य माहिती दिली जात नसल्याने, ग्राहक सेवा विभागाकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत नाही, अशी अनेक तक्रारी प्रवाशांकडून समोर येत आहेत.

Comments
Add Comment

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या

पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार

कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार

रशिया, जपानसह अनेक देश भारतीयांना नोकऱ्या देण्यास उत्सुक!

कामगारांचा तुटवडा निर्माण झाल्याने भारतीयांना पसंती नवी दिल्ली : अमेरिका, कॅनडा आणि इतर अनेक विकसित देश शिक्षण