Corona Remedies IPO Listing: कोरोना रेमिडीज शेअरचे आज दमदार लिस्टिंग गुंतवणूकदार झाले मालामाल ३८% प्रिमियमसह

मोहित सोमण: कोरोना रेमिडीज आयपीओचे आज जबरदस्त प्रिमियम दरात सूचीबद्ध (Listing) झाले आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच शेअर ३८% प्रिमियम दराने यशस्वी ठरला. मूळ प्राईज बँड १०६२ तुलनेत ३८% प्रति शेअर दरासह शेअर १४७० रूपयांना सूचीबद्ध झाला. ८ ते १० डिसेंबर दरम्यान उपलब्ध असलेल्या आयपीओला (IPO) १३७.०४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. ११ डिसेंबरला पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात आले. आज १५ डिसेंबरला शेअर सूचीबद्ध झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४८६८ रूपये गुंतवणूक करणे आयपीओसाठी अनिवार्य करण्यात आले होते. या फार्मा उत्पादन कंपनीला एकूण १४४.५४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते ज्यामध्ये किरकोळ अथवा रिटेल गुंतवणूकदारांकडून ३०.३९ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २९३.८० पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २२०.१८ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले. कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १८% वाढ झाली असून करोत्तर नफ्यात (PAT) ६५% वाढ नोंदवली गेली.


शेअर सूचीबद्ध होण्यापूर्वी शेवटची ग्रे मार्केट किंमत (GMP) ३२.२५% होती. या अपेक्षेलाही मागे टाकत दमदार पदार्पण शेअरने बाजारात केले आहे. एकूण ६५५.३७ कोटी बूक व्हॅल्यु मूल्यांकन असलेल्या या आयपीओत नवीन शेअर भांडवल ऑफर करण्यात आले नव्हते तर संपूर्ण आयपीओत ०.६२ कोटीचे शेअर गुंतवणूकदारांसाठी दाखल झाले होते. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १९४.८६ कोटी निधी प्राप्त केला होता.


ऑगस्ट २००४ मध्ये स्थापन झालेली कोरोना रेमेडीज लिमिटेड ही महिला आरोग्यसेवा, हृदयरोग, वेदना व्यवस्थापन, मूत्रविज्ञान आणि इतर उपचारात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादने विकसित करणारी, उत्पादन करणारी आणि विपणन करणारी एक औषध कंपनी आहे. उपलब्ध माहितीनुसार ३० जून २०२५ पर्यंत, कंपनीच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये महिला आरोग्यसेवा, हृदयरोग-मधुमेह, वेदना व्यवस्थापन, मूत्रविज्ञान आणि मल्टीस्पेशालिटी फार्मास्युटिकल्स ,जीवनसत्त्वे/खनिजे/पोषण, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि श्वसन यासारख्या उपचारात्मक क्षेत्रांमध्ये ७१ ब्रँड समाविष्ट आहेत.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, राज्यात कुठे होणार युती आणि कुठे मैत्रीपूर्ण लढती ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का

धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही