Sydney Shooting ; सिडनीत बॉन्डी बीच वर बेछूट गोळीबार , मायकल वॉनने पोस्ट करत सांगितला अनुभव

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सुरक्षित शहरांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सिडनीतील बॉन्डी बीच परिसरात बेछूट गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या गोळीबारात दहा पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांमध्ये पोलिसांचाही समावेश आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या थरारक घटनेत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन थोडक्यात बचावला आहे. स्वतः वॉनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या भीषण अनुभवाची माहिती दिली आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, बॉन्डी बीच परिसरात ज्यू समाजाचा उत्सव सुरू होता. मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले असतानाच अचानक गोळीबार सुरू झाला. गोळीबाराचे आवाज ऐकताच एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धाव घेतली.


या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. एकूण दोन हल्लेखोर होते त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याला पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांपैकी एकाचे नाव नावीद अक्रम असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी नावीदचामायकल वॉन वाहन परवाना जप्त केला आहे.


गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण बॉन्डी बीच परिसर सील करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या गोळीबाराच्या वेळीMichael Vaughan बॉन्डी बीच परिसरातच उपस्थित होता. वॉनने एका रेस्टॉरंटमध्ये लपून राहून स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर वॉनने पोस्ट करत आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. बॉन्डीमधील एका रेस्टॉरंटमध्ये लपून राहणं हा अत्यंत भयावह अनुभव होता. मी आता सुरक्षित आहे. आपत्कालीन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि परिस्थितीचा सामना करणाऱ्यांचे आभार, असं मायकल वॉनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.



मायकल वॉनची क्रिकेट कारकीर्द


मायकल वॉनने इंग्लंडकडून ८२ कसोटी, ८६ एकदिवसीय आणि २ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. नेतृत्वगुणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या वॉनने इंग्लंड संघाचं दीर्घकाळ नेतृत्व केलं आहे. त्याने ५१ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचं नेतृत्व केलं असून त्यापैकी २६ सामने जिंकले, ११ सामने गमावले तर १४ सामने अनिर्णित राहिले आहेत.

Comments
Add Comment

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे

'अकारी पडीत जमीनी शेतकऱ्यांना मिळाव्यात हीच माझी भूमिका'

मुंबई: काॅग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे आरोप अतिशय बिनबुडाचे असून,त्यांनी उपस्थित केलेल्या माहीतीशी

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती