नवी दिल्ली : भारताची हवाई वाहतूक नियामक संस्था, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संकटात सापडलेल्या इंडिगोच्या सुरक्षा व कार्यकारी अनुपालनावर देखरेख करणाऱ्या चार विमान निरीक्षकांना बडतर्फ केले आहे. एअरलाईनच्या तपासणी व देखरेखीमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. कडक सुरक्षा नियमांचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने इंडिगोने या महिन्यात हजारो उड्डाणे रद्द केली., ज्यामुळे देशभरात हजारो प्रवासी अडकून पडले. ५ डिसेंबर रोजी रद्द झालेल्या उड्डाणांची संख्या सर्वाधिक होती आणि त्यानंतर ती कमी झाली आहे.