नोटबंदीच्या ९ वर्षांनंतर दिल्लीत ३ कोटींच्या जुन्या नोटा जप्त

नवी दिल्ली  : नोटाबंदीच्या नऊ वर्षांनंतरही, दिल्लीत ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. दोन कारमध्ये एकूण ३.६० कोटी रुपये सापडले. उत्तर दिल्लीच्या वजीरपूर परिसरात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की, तरुण आणि आशीष नावाच्या दोन तरुणांनी कमिशनचे आमिष दाखवून या नोटा पाठवल्या होत्या. पोलीस आता या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या चार जणांची ओळख हर्ष, टेकचंद ठाकूर, लक्ष्य आणि विपिन कुमार अशी आहे. चौकशीत त्यांनी हे नोटांचे बंडल नोएड्यातील तरुण आणि आशीष नावाच्या दोन व्यक्तींनी दिल्याचे सांगितले. पोलीस आता या दोघांच्या शोधात आहे. अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत कबूल केले की त्यांनी लोकांना कमी किमतीत जुन्या नोटांचे बंडल देण्याचे आमिष दाखवले होते. 'आधार कार्ड दाखवले तर आरबीआय या नोटा पुन्हा बदलून देईल, असे ते सांगत होते. २०१६ नंतर जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपली असल्याचे सर्वांना माहीत असूनही या टोळीने लोकांची दिशाभूल केल्याचे डीसीपी भीष्म सिंह यांनी सांगितले. आरोपी २०२१ पासून अशा प्रकारच्या व्यवहारात गुंतलेले होते.
Comments
Add Comment

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी साधला संवाद

मुंबई : वॉर्ड विकासासाठी सत्तेचा वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा

माथेरानमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूट

कदम दाम्पत्याला दोरीने बांधून चोरटे फरार माथेरान (वार्ताहर): पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये टी स्टॉलवर

भाजप हीच देशाची पहिली पसंती: पंतप्रधान मोदी

सुशासनासाठी जनतेचा विक्रमी जनादेश! देशाला आता केवळ विकास आणि 'गुड गव्हर्नन्स' हवा दिसपुर (वृत्तसंस्था): आज भाजप

जागतिक बेरोजगारी यंदा ४.९% वर स्थिर राहण्याचा अंदाज

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ताज्या अहवालानुसार, २०२६मध्ये जागतिक

इराणमधील हिंसक आंदोलनात आतापर्यंत ५ हजार जणांचा मृत्यू

तेहरान(वृत्तसंस्था): इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे आतापर्यंत किमान पाच हजार जणांचा मृत्यू झाला