मुंबईसह राज्यातल्या २९ महापालिकांसाठी कधी होणार मतदान ?

मुंबई : महापालिका निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे.नगर परिषद निवडणुका पार पाडल्यानंतर आता राज्याचे लक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.


सात-आठ वर्ष रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबर नंतर कधीही होऊ शकते , अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल. आगामी १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच १५ डिसेंबरनंतर निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.


राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र उर्वरित २७ महानगरपालिका निवडणुकांसाठी मार्ग खुला झाला असल्याचे संकेत आधीच निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे आता पुढील आठवड्यातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सगळ्यांचे लक्ष आहे.


महापालिकांसाठी कधी होणार मतदान?


सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे यावेळी निवडणूक प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल. याआधी २०१७ मध्ये निवडणुकीची घोषणा आणि मतदान यात दोन महिन्यांचे अंतर होते.

Comments
Add Comment

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे