'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - हाऊसिंग फॉर ऑल’ योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; दहिसर आणि जुहूतील रडारचे स्थलांतर होणार

नागपूर : 'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यासाठी राज्य सरकारने ‘हाऊसिंग फॉर ऑल’ ही नवी योजना जाहीर केली असून, फनेल झोन, जुहू लष्करी ट्रान्समिशन स्टेशन, कांदिवली-मालाड सीओडी परिसरातील उंची आणि इतर निर्बंधांमुळे अडकलेल्या भागांत आता पूर्ण क्षमतेने पुनर्विकास शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत याबाबत निवेदन केले.


या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) ३०० चौ. फूट आणि कमी उत्पन्न गटासाठी (एलआयजी) ६०० चौ. फूटांपर्यंतच्या सदनिकांचा पुनर्विकास विनाशुल्क करता येणार आहे. यासाठी प्रोत्साहनात्मक एफएसआय (इन्सेंटिव्ह एफएसआय) उपलब्ध करून देण्यात येणार असून, मूळ जमीनमालकांचा मूलभूत एफएसआयचा हक्क अबाधित राहील. न वापरता राहिलेल्या एफएसआयला (अनकंझ्युम्ड एफएसआय) टीडीआर स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे, ज्यामुळे प्रकल्पांसाठी निधी उभारणी सोपी होईल. तसेच, डीसीआर ३३(७) आणि ३३(९) अंतर्गतचे विद्यमान प्रोत्साहन, प्रीमियम आणि इतर फायदे कायम राहतील.


मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘या योजनेमुळे मुंबईतील सर्व पुनर्विकास प्रकल्प व्यवहार्य होतील आणि त्यांना गती मिळेल. यापूर्वी अव्यवहार्य ठरलेले प्रकल्प, जसे जुहू लष्करी परिसर आणि कांदिवली-मलाड सीओडी भागातील, आता शक्य होतील. तेथील रहिवाशांना याचा थेट फायदा होईल.’’ पुनर्विकासातील इतर अडथळे दूर करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.



दहिसर आणि जुहूमधील रडारचे स्थलांतर


पुनर्विकासातील आणखी एक मोठा अडथळा दूर करण्यासाठी दहिसर आणि जुहू (डी. एन. नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रडारमुळे परिसरातील इमारतींच्या उंचीवर कडक निर्बंध आहेत, ज्यामुळे पुनर्विकास अशक्य झाला होता. केंद्राच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ने दहिसरचे रडार गोराईला हलवण्यास सहमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार स्थलांतराचा खर्च उचलेल आणि पर्यायी जमीन मोफत उपलब्ध करून देईल. बदल्यात, एएआय दहिसर येथील आपल्या ५० टक्के जमिनीचा वापर सार्वजनिक उद्यानासाठी करेल. जुहूच्या रडारसाठीही सरकारने एएआयच्या तांत्रिक पथकाला पर्यायी जागा सुचवली असून, पथकाची पाहणी सुरू आहे. तांत्रिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर स्थलांतराला मंजुरी मिळेल. या स्थलांतरानंतर दहिसर आणि जुहू परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या