डहाणू जमीन घोटाळा प्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी निलंबित निवृत्त महसूल अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीला चाप

४ गुंठ्याचे ४० गुंठे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा


नागपूर : बाडापोरखण ता. डहाणू (जि. पालघर) येथील जमिनीच्या ४ गुंठ्याचे परस्पर ४० गुंठे करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.


संतोष कोटनाके तलाठी तर मंडल अधिकाऱ्याचे नाव ज्योत्सना जमजाळ मंडल अधिकारी आहेत. तसेच, निवृत्त झाल्यानंतरही कंत्राटी पद्धतीने त्याच कार्यालयात काम करणाऱ्या आणि गैरव्यवहारांना खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ हटवण्यात येईल, असे आश्वासनही महसूलमंत्र्यांनी सभागृहात दिले.


शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार भास्कर जाधव आणि योगेश सागर यांनी लक्षवेधीवरील चर्चेत सहभाग घेतला.


नेमका घोटाळा काय?


डहाणू परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना, जानकीबाई (१९८६ चा फेरफार) यांच्या जमिनीच्या नोंदीमध्ये फेरफार करून राजेंद्र राऊत यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत केले. यातून ४ गुंठे जमिनीचे क्षेत्र ४० गुंठे दाखवण्यात आले. इतकेच नव्हे, तर या जागेवर बोगस झाडे लागवडही दाखवण्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत तलाठी संतोष कोटणाके आणि मंडल अधिकारी ज्योत्सना जमजाळ हिला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर आणि लाभार्थींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.


'प्रशासन उशिरा जागे झाले'


आ. भास्कर जाधव यावेळी म्हणाले, "विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यासाठी ३० दिवस आधी सूचना द्यावी लागते. सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी आणि प्रशासन जागे झाले आणि त्यांनी नोटीस बजावली. ४ गुंठ्याचे ४० गुंठे करण्याचे धाडस केवळ तलाठी करू शकत नाही, त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही अभय असते," असा आरोप जाधव यांनी केला. यावर उत्तर देताना मंत्र्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन प्रांत किंवा तहसीलदार यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे संकेत दिले.


निवृत्त अधिकाऱ्यांच्या 'टोळी'ला चाप


आ. योगेश सागर यांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. अनेक ठिकाणी निवृत्त झालेले तलाठी, सर्कल आणि इतर अधिकारी यांना कंत्राटी पद्धतीने त्याच कार्यालयात पुन्हा कामावर घेतले जाते. हे अधिकारी माहितीचा गैरवापर करून जमिनींचे वाद आणि घोटाळे निर्माण करतात. यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, "पालघर, ठाणे, रायगड, नवी मुंबई, नाशिक, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि लगतच्या भागात निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नेमले असेल, तर त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ कामावरून कमी करण्यात येईल," अशी घोषणा केली.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा