दिग्दर्शक महेश मांजरेकरांशी भेट...

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


अतुल काळे

लेखन, अभिनय, दिग्दर्शन व गायन या सर्व क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारा एक कलावंत म्हणजे अतुल काळे.
अतुलचे शालेय शिक्षण गिरगावमधील चिराबाजार येथील सेंट सॅबेस्टियन हायस्कूलमध्ये झाले. सातवीत असताना त्यांनी शाळेतील नाटकामध्ये स्त्री व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी चौपाटीच्या भवन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांच्या गायनाच्या करिअरला सुरुवात झाली. तेथे त्यांची ओळख दिग्दर्शक देवेंद्र पेमसोबत झाली. त्यांच्यासोबत त्यांनी अनेक एकांकिका केल्या. फार्ष बाबूच्या प्रेमाचा, कथा एका मस्त रामाची, प्लँचेट या एकांकिकेचा त्यात समावेश होता.


१९९१ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरी लागली. तेथे संजय नाडकर्णी (ऑर्गनायझर) यांनी त्यांच्या गायनाला प्रोत्साहन दिले. त्यांनी महेंद्र कपूर, जॉनी लिव्हर, अनवर यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणे गायली. १९९५ मध्ये त्यांच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला. त्यांचा अपघात झाला होता. हाताला मार लागला होता. तीन महिने ते घरीच होते. देवेंद्र पेमने त्यांना ‘ऑल दी बेस्ट’ हे नाटक इंग्रजीमध्ये करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांची ओळख दिग्दर्शक महेश मांजरेकरांशी झाली. त्या नाटकाचे ५६ प्रयोग त्यांनी केले.


२००० साली त्यांनी नोकरी सोडली व अभिनयाच्या क्षेत्रात त्यांचे करिअर सुरू झाले. निदान, वास्तव, जिस देश मे गंगा रहता है, हत्यार, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, डियर जिंदगी, गोल्ड, अंतिम, साम बहादुर या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. वास्तव चित्रपट करीत असतानाच महेश मांजरेकरांचा पराग कुलकर्णी नावाचा मित्र भेटला. त्याने रूपा बनियानची जाहिरात त्यांना दिली. एम टीव्हीसाठी रूपा की बनियान पहेनोगे हा प्रोमो केला. अशा प्रकारे जाहिरात क्षेत्र त्यांच्यासाठी खुले झाले. हा त्याचा जाहिरात क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारा टर्निंग पॉइंट ठरला. जाहिरात क्षेत्रातील अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी कामे केली. सबल सरकार, प्रसून पांडे, दादू आणी बोढायन, रेन्सिल डिसिल्वा, प्रल्हाद कक्कड इत्यादी. दहा वर्षांनंतर अतुलने स्वतः स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली. तिचा बाप त्याचा बाप हा त्यांचा पहिला स्वतंत्र दिग्दर्शन केलेला चित्रपट होता. असा मी अशी ती, बाळकडू, संदूक इत्यादी. गोल गोल गरा गरा ही झी वाहिनीसाठी त्यांनी टेलिफिल्म केली. झी ५ वरील जनावर ही वेब सिरीज त्यांनी केली.


मी शिवाजीराजे भोसले बोलतोय साठी बॅक ग्राउंड म्यूजिकसाठी त्यांना झी अवॉर्ड मिळाला. दे धक्का चित्रपटासाठी बेस्ट म्यूजिकसाठी दत्ता डावजेकर अवॉर्ड आहे. माझा होशील ना व जीवाची होती या काहीली या मालिका त्यांनी केल्या. सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले. मराठी, हिंदी, हिंग्लिश, हॉलिवूड साऱ्याच ठिकाणी त्यांनी काम केले. हिंदीतील अनेक मालिकांमध्ये त्यांनी कामे केलेली आहेत.अनंत महादेवन, सतीश शाह, शेखर सुमन सोबत त्यांनी कामे केलेली आहेत. भारत दाभोळकर सोबत हिंग्लिश नाटकात त्यांनी काम केले.
दर्जेदार कामे करण्याकडे त्यांचा कल आहे, हल्ली इंस्टाग्रामचे फॉलोअर्स पाहून कामे दिली जातात, ही बाब त्यांना पटत नाही. अजून चांगले टर्निंग पॉइंट्स
जीवनात येतील असा त्यांना आशावाद आहे.

Comments
Add Comment

‘आई कुठे काय करते’चा ‘मॅजिक’कार

युवराज अवसरमल, टर्निंग पॉइंट आई कुठे काय करते' ही लोकप्रिय मालिका दिग्दर्शित केल्यानंतर आता 'मॅजिक' हा सस्पेन्स

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत

युवराज अवसरमल क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम ' हा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिवसेंदिवस

‘कामत लेगसी’कडून ‘द ग्रेट साउथ इंडियन बिर्याणी फेस्टिव्हल’

कामत लेगसी’ वर्षाचा शेवट खास चवदार अनुभवाने करण्यासाठी ‘द ग्रेट साउथ इंडियन बिर्याणी फेस्टिव्हल’ सादर करत आहे.

आईला सर्व प्रश्नांचे ‘उत्तर’ माहीत असते

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  ऋता दुर्गुळेने अभिनयाच्या क्षेत्रात आपला चांगलाच ठसा उमटविला आहे. 'उत्तर ' हा तिचा

एकांकिकांचे विश्व आणि बोलीभाषांचे प्रयोग...!

राजरंग : राज चिंचणकर मराठी नाट्यसृष्टीच्या अवकाशात एकांकिका स्पर्धांचे वेगळे विश्व सामावलेले आहे. एकांकिका

उतावळे परीक्षक आणि अकलेला बाशिंग

पाचवा वेद : भालचंद्र कुबल भाग दोन हा लेख जेव्हा तुम्ही वाचत आहात तेव्हा ६४व्या हौशी मराठी राज्य नाट्य