'एसआरए' इमारतींच्या देखभाल निधीत वाढ, लिफ्टसाठी सौर ऊर्जेचा वापर - राज्य सरकारचा निर्णय;

ओसी देण्यापूर्वी इमारतीवर सोलार पॅनल लावणे बंधनकारक


नागपूर : महायुती सरकारने एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) आणि म्हाडा पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवाशांना दिलासा देणारे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इमारतीच्या देखभाल निधीत (कॉर्पस फंड)इमारतीच्या उंचीनुसार मोठी वाढ करण्यात येणार असून, लिफ्ट आणि सामाईक भागांचा वीज खर्च कमी करण्यासाठी ओसी (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) देण्यापूर्वी सोलार पॅनल बसविणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शनिवारी विधानसभेत केली.


झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत उंच टॉवरमध्ये स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना वाढलेला देखभाल खर्च आणि वीज बिलाचा भार सहन करावा लागत असल्याच्या समस्येवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, पूर्वीच्या ४० हजार रुपये कॉर्पस फंडच्या व्याजातून हा खर्च भागवणे कठीण झाले आहे. या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जाहीर केले की, कॉर्पस फंडाची रक्कम आता इमारतीच्या उंचीनुसार वाढवली जाईल. हा बदल महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ नुसार अधिसूचना जारी करून लागू करण्यात येईल. हरकती-सूचनांवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच अंमलबजावणी होईल.



कॉर्पस फंडाची रक्कम किती असेल?


७० मीटरपर्यंत उंचीच्या इमारतीसाठी : १ लाख रुपये
७० ते १२० मीटर उंचीच्या इमारतीसाठी : २ लाख रुपये
१२० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी : ३ लाख रुपये



सौर ऊर्जेचा वापर अनिवार्य


मंत्री भोयर यांनी सांगितले की, ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी पुनर्विकास प्रकल्पांत ओसी देण्यापूर्वी इमारतीवर सोलार पॅनल बसविणे बंधनकारक करण्यात येईल. विशेषतः लिफ्ट आणि सामाईक भागांसाठी सौर ऊर्जेचा वापर अनिवार्य असेल. ओसीशिवाय ताबा देणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई होईल आणि अपूर्ण इमारतींमध्ये पजेशन दिल्यास सखोल चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

लातूरचे नवोदय विद्यालय हादरलं; वसतिगृहात विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत

लातूर : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

Buldhana : बुलढाण्याचा अडीच वर्षांचा चिमुकला ठरला 'गुगल बॉय', फक्त २ मिनिटांत ७१ देशांच्या राजधान्या तोंडपाठ

'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये कोरले नाव बुलढाणा : ज्या वयात मुले अडखळत शब्द बोलू लागतात, त्याच वयात बुलढाणा

Devendra Fadanvis : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन

सातारा दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा

इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात ; पुणे परिवहन मंडळाचा अथर्वला इशारा

PMPML Issues Notice Influencer Atharva Sudame: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे

सहा किलोमीटरची जीवघेणी पायपीट, बाळाचा पोटातच मृत्यू, टाहो फोडत आईनंही जीव सोडला

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे एका नऊ महिन्यांच्या

प्रशासनाचा भोंगळ कारभार! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील दोन मृत