मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा

नागपूर : जुन्या लोकांना तातडीने घरे देणे तसेच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. महाराष्ट्रात तसेच मुंबईमध्ये वन, कांदळवन, सीआरझेड, इत्यादी ठिकाणी मूळ स्थितीत पुनर्विकास होऊ शकत नाही. तसेच बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे की रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी व मलनिस्सारण प्रकल्प इत्यादींना जलदगतीने पुढे नेण्यासाठी पीएपीची गरज भासते.


त्याचप्रमाणे समाजातील गरीब गरजू घटकांना जसे गिरणी कामगार, डब्बेवाले, माथाडी इत्यादींना घरे देण्याचे शासनाने धोरण स्विकारलेले आहे. या सर्वांना वेळेवर घरे देता याकरीता मोठ्या प्रमाणात राज्यस्तरावर हौसिंग स्टॉकची आवश्यकता लागणार आहे, आणि म्हणूनच याबाबतीत निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


या सर्व घटकांना घरे देण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून उपलब्ध होणारे हौसिंग स्टॉकला एकत्रित करून त्याचा सुनियोजित प्राधान्यक्रमाने वितरण करण्याचे शासनाने धोरण ठरविले आहे. या हौसिंग स्टॉक करीता मुंबईतील ३३ (७), ३३ (९), ३३ (१२ बी) यासह विविध योजना तसेच राज्यस्तरावरील इन्क्ल्युसिव्ह हौसिंग, पीएमएवाय इत्यादी योजनांचा समावेश करण्याचा आमचा मानस आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले


खारफुटीच्या जमिनींवर अतिक्रमणे करण्याचे प्रकार घडले आहेत. कांदळवन संरक्षित राहिले पाहिजे , त्याचे जतन केले पाहिजे हे लक्षात घेऊन ग्रीन टीडीआर देण्याबाबत विचार केला जाईल असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी' दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी

मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदे सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'; गृहनिर्माण क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय, लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा

नागपूर : "मुंबईबाहेर गेलेला चाकरमानी पुन्हा मुंबईत परतला पाहिजे, हीच स्व. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ती

मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार, विधानसभा अध्यक्षांचा इशारा

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत आले, तरी आमदारांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तरे

मुंबईत फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा ; पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाची नवीन योजना

नागपूर : मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा, १७ हजार घरांची लॉटरी लवकरच नागपूर : नवी मुंबईतील सिडकोच्या

'एसआरए' इमारतींच्या देखभाल निधीत वाढ, लिफ्टसाठी सौर ऊर्जेचा वापर - राज्य सरकारचा निर्णय;

ओसी देण्यापूर्वी इमारतीवर सोलार पॅनल लावणे बंधनकारक नागपूर : महायुती सरकारने एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन