मुंबई : मुंबईतील तील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘Housing for All’ अंतर्गत नवीन धोरण मांडण्यात आले आहे. फनेल झोन, जुहू मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन, कांदिवली-मालाड COD परिसर आणि संरक्षित क्षेत्रांमुळे ज्या भागांमध्ये पूर्ण क्षमतेने पुनर्विकास शक्य नव्हता, ते प्रकल्प या नव्या योजनेमुळे व्यवहार्य ठरणार आहेत.
या योजनेअंतर्गत EWS घटकासाठी ३०० चौरस फूटपर्यंत मोफत FSI देण्यात येणार असून, LIG घटकासाठी ६०० चौरस फूटपर्यंत सदनिकांचे पुनर्वसन विनाशुल्क केले जाणार आहे. पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला प्रोत्साहन FSI देण्यात येणार असून, मूळ जमीन मालकांचा बेसिक FSI चा हक्क अबाधित राहणार आहे. न वापरलेला FSI TDR स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या धोरणामुळे बृहन्मुंबईतील सर्व पुनर्विकास प्रकल्प शक्य होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, दीर्घकाळ रखडलेले जुहू मिलिटरी परिसर आणि कांदिवली-मालाड COD परिसरातील प्रकल्पही मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामुळे लाखो रहिवाशांना दिलासा मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.






