राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट


नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे किमान झाली असून, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने सांगितला. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे.


नागपूरच्या एमआयडीसी, पाचपावली आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांचा मृत्यू थंडीने गारठल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तिघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. ते बेघर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचपावली येथे मेट्रोच्या पिलरखाली, तर एमआयडीसी परिसरात कॅफेसमोर मृतदेह आढळून आले. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात आणि विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.


किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. राज्यात पुढील ४८ तासात किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होणार असून त्यानंतर २ ते ३ अंश सेल्सिअसने किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


परभणीचा पारा घसरला


परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून परभणीचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. दोन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. सध्या परभणीचे तापमान ५.५ अंशांवर नोंदवले गेले आहे, आणि त्यामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाडे गोठवणारी थंडी जाणवत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात ही शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. येवढ्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी शेतात ऊस ,हरबरा, ज्वारी , या पिकांना रात्रीची लाईट असल्याने पाणी देत आहे, तर परभणीचे तापमान अतिशय कमी झाले असल्याने शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहे.


थंडीमुळे तीन जणांचा मृत्यू


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व भागांत कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक ठिकाणी तर पारा १० अंशांच्या खाली आला आहे. विदर्भात तर थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृत्यू हे थंडीने गारठून झाल्याची शक्यता सांगितले जात आहे.


Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.