Thursday, March 26, 2026

Stock Market Opening Bell: शेअर बाजारात जबरदस्त 'किक स्टार्ट' रिटेल गुंतवणूकदारांसाठी धमाल, सेन्सेक्स ४०४.९५ अंकाने व निफ्टी १२९ अंकाने उसळला

Stock Market Opening Bell: शेअर बाजारात जबरदस्त 'किक स्टार्ट' रिटेल गुंतवणूकदारांसाठी धमाल, सेन्सेक्स ४०४.९५ अंकाने व निफ्टी १२९ अंकाने उसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात जबरदस्त 'किक स्टार्ट' मिळाली आहे. काल युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर आज शेअर बाजारात सार्वत्रिक उत्साहाचे वातावरण कायम असल्याने बाजारात उर्वरित विस्तारित रॅली झाली आहे. सेन्सेक्स ४०४.९५ अंकाने व निफ्टी १२९ अंकाने उसळला आहे. काल अखेरच्या सत्रातील मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये रॅली कायम राहिल्याने त्याचा जबरदस्त फायदा आज दिवसभरात अपेक्षित आहे. सकाळच्या सत्रात सर्वाधिक क्षेत्रीय निर्देशांकातील वाढ आजही मेटल, रिअल्टी, केमिकल्स, तेल व गॅस या निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे आज चीनच्या मजबूत फंडामेंटलमुळे आगामी काळात चीनमध्ये उपभोग व उत्पादनात वाढ अपेक्षित असल्याचे तज्ञांनी म्हटले असून आशियाई पॅसिफिक बाजारात त्याचा परिणाम येणाऱ्या दिवसात शेअर बाजारात दिसेल. चीनच्या नेत्यांनी गुरुवारी वार्षिक आर्थिक नियोजन बैठकीचा समारोप केला आहे.

सुरुवातीच्या कलात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.३३%), हेंगसेंग (१.४२%), स्ट्रेट टाईम्स (१.१७%), निकेयी २२५ (०.९४%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली असून आकडेवारी येणार असल्याने गुंतवणूकदारांनी चीनमध्ये सावधगिरी बाळगल्याने शांघाई कंपोझिट (०.०४%) निर्देशांकात घसरण झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ टीआरआयएल (१०.०८%), जीएमडीसी (६.१७%), तेजस नेटवर्क (५.१९%), हिंदुस्थान कॉपर (३.८४%), कायनेस टेक (३.६५%), अनंत राज (३.३२%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण वन सोर्स स्पेशालिटी (१.४३%), टाटा टेलिकम्युनिकेशन (१.३०%), डीसीएम श्रीराम (१.२९%), इंडिया मार्ट इंटरनॅशनल (०.९५%),केफीन टेक्नॉलॉजी (०.८६%) समभागात झाली आहे.

आजच्या सत्रपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' किरकोळ गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक वर्तनाचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये सतत येणारा ओघ, जो गेल्या तीन महिन्यांत सातत्याने २९००० कोटींपेक्षा जास्त आहे. यामुळे एफआयआय विरुद्ध डीआयआय यांच्यातील संघर्षात डीआयआयना बळकटी मिळाली आहे आणि डीआयआयना एफआयआयकडून होणारी सततची विक्री आत्मसात करण्यास सक्षम केले आहे. निरोगी एसआयपी प्रवाहाच्या संदर्भात, विशेषतः जेव्हा अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असेल आणि कमाई वाढीची शक्यता सुधारत असेल, तेव्हा एफआयआयना सतत विक्री करणे आणि बाजारात उच्च शॉर्ट पोझिशन राखणे कठीण होईल.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा