'तरूणांसाठी' पोकोचा नवा C85 5G स्मार्टफोन बाजारात लॉच

मुंबई: व्हॅल्यू फॉर मनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोको (POCO) ब्रँड हा तरुणाईला नेहमीच भावतो. अशातच कंपनीने आपल्या ब्रँड पोर्टफोलिओत वाढ करण्यासाठी कंपनीने आपला नवा C85 ब्रँड बाजारात आणला आहे. या नव्या पोको सी८५ (POCO C85) ५जी सह पुन्‍हा एकदा बजेट स्‍मार्टफोन विभागात पोको धुमाकूळ निर्माण करण्‍यास सज्‍ज आहे.


उपलब्‍धता आणि लाँच ऑफर्स -


१६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर पोको सी८५ च्‍या विक्रीला सुरूवात होईल, त्‍याची सुरूवातीची किंमत ४ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १०९९९ रूपये, ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरएिण्‍टसाठी ११९९९ रूपये आणि ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३४९९ रूपये किंमत असणार आहे. लाँच ऑफरचा भाग म्‍हणून ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा एसबीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्सचा वापवर करत १,००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटचा आनंद घेऊ शकतात किंवा पात्र डिवाईसेसवर १००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज बोनसचा अवलंब करू शकतात असे कंपनीने म्हटले. तसेच, क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर ३ महिने नो-कॉस्‍ट ईएमआय उपलब्‍ध आहे. (वरील ऑफर्स फक्‍त विक्रीच्‍या पहिल्‍या दिवशी लागू आहेत)


फोनची फिचर्स -


6000 MAH Battery


33 W Fast Charger( कंपनीच्या दाव्यानुसार, फक्‍त २८ मिनिटांमध्‍ये ५० टक्‍के चार्ज होतो)


१० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग डिवाईसला पोर्टेबल पॉवर बँक बनवते. ज्‍यासह मोबाइल्‍स, टीडब्‍ल्‍यूएस इअरबड्स, स्‍मार्टवॉचेस् आणि इतर अँक्‍सेसरीज चार्ज करता येतात


क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशिंग आहे. हा स्‍मार्टफोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्‍लॅक या रंगांमध्‍ये उपलब्‍ध


सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच एचडी+ डिस्‍प्‍लेसह १२० हर्ट्झ अँडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट


Mediatek Dimensity 6300 Processor (जवळपस ४५०के+ Antutu Score) 


16 GB Ram 


Android 15


HyperOS 2.2


IP64 Ratings (धूळरोधक व जलरोधक)


50 Megapixel Camera (एआय ड्युअल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्‍सल सेल्‍फी शूटर)


या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत पोको इंडियाचे जीटीएम हेड अंकित सिंग म्‍हणाले आहेत की,'आम्‍हाला नवीन पोको सी८५ ५जी लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या डिवाईसमध्‍ये शक्‍ती, कार्यक्षमता व नाविन्‍यता आहे, जे बजेट स्‍मार्टफोन श्रेणीमधील मर्यादांना दूर करतो. ६००० एमएएच बॅटरी, ३३ वॅट फास्‍ट चार्जिंग आणि १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंगसह सेगमेंटमधील सर्वोत्तम बॅटरी अनुभव देणाऱ्या या डिवाईसमध्‍ये सेगमेंटमधील सर्वात मोठे ६.९ इंच डिस्‍प्‍ले आहे आणि हा स्‍मार्टफोन किफायतशीर आहे. पोको सी८५ ५जी तुम्‍हाला व्‍यस्‍त कामकाजामध्‍ये मदत करण्‍यसाठी, दीर्घकाळापर्यंत मनोरंजनाचा आनंद देण्‍यासाठी आणि तडजोड न करता अँप्‍स सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसमधील प्रत्‍येक वैशिष्‍ट्य युजरना मुक्‍तपणे व आत्‍मविश्वासाने फ्लॉण्‍ट युअर पॉवर देण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आले आहे.'


पोको इंडियाचे मार्केटिंग हेड केन शेखर म्‍हणाले आहेत की,'पोकोमध्‍ये आमचे आमच्‍या डिवाईसेसमध्‍ये, तसेच आम्‍ही देणाऱ्या अनुभवांमध्‍ये दीर्घकाळापर्यंत पॉवर देण्‍याचे मिशन आहे. पोको सी८५ ५जी सह आम्‍ही अविरत कार्यक्षमतेला आधुनिक डिझाइन आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशसह एकत्र केले आहे, ज्‍यासह वापरकर्ते अभिमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतील. गेमिंग, मनसोक्‍त मनोरंजनाचा आनंद घ्‍यायचा असो किंवा मल्‍टीटास्किंग करायचे असो सी८५ तडजोड न करणारा अनुभव देतो.'

Comments
Add Comment

Fashion Tips: तुमचा ड्रेसिंग सेन्स बोरिंग वाटतोय? वॉर्डरोबमध्ये ॲड करा 'या' गोष्टी; तुमची पर्सनालिटी एका क्षणात बदलेल

तुमचा ड्रेसिंग सेन्स नेहमीसारखाच वाटत असेल, तर संपूर्ण वॉर्डरोब बदलण्याची गरज नाही. योग्य अॅक्सेसरीज, स्टायलिश

Jeans Styling Tips : प्रत्येक मुलीने ट्राय करावेत जीन्ससोबतचे 'हे' ८ स्टायलिश टॉप्स

बेसिक व्हाईट टी-शर्ट (Basic White T-Shirt) https://prahaar.in/2026/07/19/want-to-look-stylish-then-definitely-try-these-trendy-skirts/ ब्लू किंवा ब्लॅक जीन्ससोबत साधा व्हाईट टी-शर्ट

Nashik : खाकीला डाग ! 10 हजारांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार रंगेहात ताब्यात

Nashik : खाकीला काळीमा लावण्याचे काम नाशिकमधील दोन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात

Nashik : रिंग रोडच्या मुद्द्यावर, निश्चितपणे मार्ग काढणार - मंत्री गिरीश महाजन

नाशिक : रिंग रोडच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, “या प्रकरणात १५ ते २० टक्के

Nashik News : 'आपला कुंभ, आपली जबाबदारी' पुस्तिकेचे प्रकाशन

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा नाशिककरांसह सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी

India vs England : टीम इंडियासमोर इंग्लंडचे ३८८ धावांचे कठीण आव्हान

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणफेक