वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिजात भ्रष्टाचार

ईटीएस मोजणी अहवाल दोन महिन्यांत सादर करा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश


नागपूर : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिजात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्यामुळे सरकारचा ६०० कोटींचा महसूल बुडाल्याची तक्रार अमोल कोमावार यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. याप्रकरणी गौण खनिज ईटीएस मोजणी अहवाल दोन महिन्यात सादर करा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी दिले.


याप्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांच्या रवी भवन येथील दालनात बैठक घेण्यात आली. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करत विकले. त्यात सरकारचा महसूल बुडाला आहे. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीनंतर पुसद तसेच उमरखेड तालुक्यात तहसीलदारांनी दंडात्मक कारवाई सुरू करत १ कोटीपेक्षा अधिक दंडात्मक कारवाई केली. मात्र ही कारवाई गौण खनिज अनधिकृत घेणाऱ्या शेतकऱ्यांवर करण्यात आली. अनाधिकृत गौण खनिज विक्रेत कोण, त्यांना मदत करणारे खरे सरकार मधील अधिकारी कोण? यांची नावे मात्र दडवणिण्यात येत आहेत, असे बनसोडे यांनी सांगितले.


त्यामुळे तहसीलदार, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख, रेल विकास निगम यांनी एकत्रित कमिटी तयार करत ईटीएस मोजणी अहवाल दोन महिन्यात सादर करा, असे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. संबंधित प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र त्यानंतरही दखल घेतली न गेल्याने उपाध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.