२०२२ नंतर प्रथमच आज रूपयात 'उच्चांकी' घसरण तर डॉलर दोन महिन्यातील निचांकी घसरणीनंतर सावरला

मोहित सोमण: आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची घोषणा झाल्यानंतर रूपयांची विक्रमी पातळीवर घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय चलन विनिमयात रूपया ९०.४२ प्रति डॉलर या निचांकी पातळीवर (All time Low) पातळीवर गेला. ज्याचा फटका आज शेअर बाजारातही काही प्रमाणात बसला आहे. डॉलरवरील दबाव घसरल्याने रूपयांच्या तुलनेत डॉलरच्या मागणीत आणखी वाढ झाल्याने रूपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे दिवसभरात रूपया ९०.२० ते ९०.३६ पातळीवर व्यवहार करत आहे. फेड दरकपातीनंतर बाँडमध्येही वाढ झाल्याने रूपयावर एक प्रकारे दबाव निर्माण झाला असल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख विक्री वाढवल्याने रॅली मर्यादित झाली आहे.


सकाळी रूपयात घसरण झाली असली तरी तज्ञांच्या मते सुरूवातीच्या सत्रावरील प्रतिकार दिसून आल्याने रूपया वाढ रोखली गेली असली तरी डॉलरमधील दबाव घसरल्याने अखेर रूपया निर्णायक स्थितीत घसरला आहे. बुधवारी अमेरिकन फेडने मोठ्या प्रमाणात अपेक्षित दर कपात केली असून २५ बेसिसने ही कपात केली ज्यामध्ये व्याजदर ३.५० ते ३.७५% प्रमाणात निश्चित झाला आहे. फेडने पतधोरण निर्णय जाहीर केल्यानंतर तज्ञांच्या मतानुसारच, सुरुवातीला त्यांच्या कमी आक्रमक दृष्टिकोनामुळे डॉलरवर दबाव निर्माण झाला होता मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रूपयात दबाव आशियाई चलनांमध्ये मिश्र व्यवहार झाले आणि डॉलर निर्देशांक जवळजवळ दोन महिन्यांच्या निचांकी पातळीवरून किंचित सावरला असून रूपयात २०२२ नंतर प्रथमच सर्वाधिक घसरण झाली आहे.


२०२२ नंतर प्रथमच रुपयाच्या मूल्यात वार्षिक घसरणीचे कारण महु पोर्टफोलिओ प्रवाहातील कमकुवतपणापासून ते भारतीय निर्यातीवरील अमेरिकेच्या वाढत्या व्यापार शुल्कापर्यंत भारताच्या बाह्य क्षेत्रासमोरील आव्हानाचा दबाव चलनावर पडला होता. बाह्य वातावरणाचा अंतर्गत वातावरणापेक्षा अधिक फटका रूपयावर पडला. आज अखेरच्या सत्रात आशियाई चलनांमध्येही मिश्र व्यवहार झाले, तर फेडच्या दर निर्णयानंतर डॉलर निर्देशांक जवळजवळ दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर काही तोटा भरून काढला. याविषयी बोलताना,'अनेक स्टॉप-लॉस (रुपयाच्या) विक्रमी नीचांकी पातळीवर सुरू झाले आणि नजीकच्या काळात चलन घसरणीच्या ट्रेंडमध्ये राहण्याची शक्यता आहे. पुढील पातळी ९०.७० आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे परकीय विनिमय संशोधन विश्लेषक दिलीप परमार माध्यमांना म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Philippines News : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 2 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण फिलीपिन्समधील झांबोआंगा

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या