अंडरवर्ल्डमध्ये नव्या डॉनची एन्ट्री ; तपासात धक्कादायक खुलासे

मुंबई : अंडरवर्ल्डच्या जगतात मोठी हालचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईपासून परदेशापर्यंत जाळं पसरवलेल्या दाऊद इब्राहिमच्या साम्राज्यावर आता नव्या गँगस्टरच्या उदयानं सावली पडत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कारवायांचा आढावा घेतल्यानंतर गुन्हेगारी जगतात नवीन समीकरणं निर्माण होत असल्याचं दिसत आहे.


अनमोल बिश्नोईने एनआयए चौकशीत दिलेल्या माहितीत लॉरेन्स बिश्नोई गँगची पोहोच, आर्थिक सामर्थ्य आणि गुन्हेगारी मॉडस ऑपरेन्डीबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या गँगचे ऑपरेशन भारताबरोबरच २५-२६ देशांपर्यंत पसरले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोशल मीडियाचा वापर, व्हर्च्युअल नंबरद्वारे धमकावणे आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या माध्यमातून या गँगने आपली गुन्हेगारी रचना उभी केल्याचे तपासात दिसत आहे.



दाऊद इब्राहिम आणि बिश्नोई गँगची तुलना का?


D-कंपनीचे जाळे प्रामुख्याने मुंबई, आखाची देश, दुबई, पाकिस्तान आणि युरोपच्या काही भागांवर मर्यादित होते. सोन्याची तस्करी, रिअल इस्टेट, ड्रग्स आणि अवैध वसुली या माध्यमातून दाऊदचे साम्राज्य उभे राहिले. पण १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आणि त्याच्या नेटवर्कवर आंतरराष्ट्रीय एजन्सींचे लक्ष केंद्रित झाले.



लॉरेन्स गँगचे व्याप्ती वेगळी


लॉरेन्स बिश्नोई गँगचे ऑपरेशन सध्याच्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे दिसते. कॅनडा, अमेरिका, थायलंड, कंबोडिया, पोर्तुगाल, रशिया यांच्यासह अनेक देशांमध्ये या गँगची उपस्थिती आढळल्याचे तपासात समोर येत आहे. फिल्म आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही या गँगने लक्ष्य केले असल्याचे प्रकरणांवरून उघड झाले आहे. काही घटनांमध्ये धमक्या देऊन आर्थिक उकळ काढण्याचा मार्ग अवलंबल्याचे आरोप आहेत.


अनमोल बिश्नोईच्या चौकशीत या गँगचे काही घटक सीमापार दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याचेही प्राथमिक तपासातून समोर आले आहे. गँगची एकूण आर्थिक उलाढाल अंदाजे १००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपास यंत्रणांच्या मते, दोन्ही गँग्सच्या कामकाजाची पद्धत भिन्न असली तरी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या वाढत्या परदेशी संपर्कामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम