Vidya Wires Share Listing: विद्या वायर्स आयपीओला चांगले सबस्क्रिप्शन मिळूनसुद्धा घोर निराशा प्राईज बँडवर शेअर सूचीबद्ध

मोहित सोमण: विद्या वायर्स (Vidya Wires Limited IPO) कंपनी आज बाजारात सूचीबद्ध (Listed) झाली आहे. मात्र आयपीओला सूचीबद्ध होताना अपेक्षित यश आलेले नाही. आयपीओतील मूळ प्राईज बँड (Price Band) असलेल्या ५२ रूपयांवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. त्यामुळे ना नफा ना तोटा या तत्वावर शेअर सूचीबद्ध झाल्याने गुंतवणूकदारांना अपेक्षित फायदा झालेला नाही. तसेही तज्ञांच्या मते केवळ ३.५ रूपये प्रति शेअर प्रिमियमसह शेअर यापूर्वी सुरु होता. मात्र आयपीओनंतर शेअरची रडतखडत सुरूवात झाली असली तरी थोड्या वेळासाठी शेअर आज ५% इंट्राडे उच्चांकावर पोहोचल्याने ५४.६० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. खासकरून एकूण २८.५३ पटीने सबस्क्रिप्शन मिळवले असले तरी जीएमपीतील नुकसान आजही कायम राहिले आहे. एकूण सबस्क्रिप्शनपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५.४५ पटीने, किरकोळ गुंतवणूकदारांकडून २९.५८ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५५.९४ पटीने सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले. प्रामुख्याने कंपनीच्या फंडामेटलमध्ये तिमाही बेसिसवर मार्च ते जून दरम्यान घसरण झाल्याने तज्ञांनी आयपीओसाठी संमिश्र कल दिला होता.
कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर २५% अधिक महसूल मिळाला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर या ५९% वाढ झाली आहे. मार्च तिमाहीतील ४०.८७ कोटींच्या तुलनेत जून तिमाहीत १२.०६ कोटींवर करोत्तर नफा (PAT) घसरला आहे. तर ईबीटा (EBITDA) मार्च तिमाहीतील ६४.२२ कोटींच्या तुलनेत या जून तिमाहीत १८.६७ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल आयपीओनंतर ११०६ कोटीवर पोहोचले होते.


३ ते ५ डिसेंबर कालावधीत हा आयपीओ बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला होता. ज्यामध्ये ३०० कोटी बूक व्हॅल्यु असलेल्या आयपीओत ५.२७ कोटीतील शेअरपैकी फ्रेश इशू म्हणून २७४ कोटींचे शेअर उपलब्ध होते तर उर्वरित २६ कोटी मूल्यांकनाचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) म्हणून उपलब्ध होते. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ९० कोटींचा निधी प्राप्त केला होता.


१९८१ मध्ये स्थापन झालेली विद्या वायर्स लिमिटेड तांबे आणि अँल्युमिनियमच्या तारांचे उत्पादन करते. कंपनी विविध उद्योगांसाठी वाइंडिंग आणि कंडक्टिव्हिटी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यासह इंजिनिअर्ड वायर, तांबे पट्ट्या, कंडक्टर, बसबार, विशेष वाइंडिंग वायर, पीव्ही रिबन आणि अँल्युमिनियम पेपर-कव्हर स्ट्रिप्स या उत्पादनांचाही कंपनीच्या पोर्टफोलिओत समावेश आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आयपीओतून मिळालेल्या निधीचा वापर कंपनी इतर खर्चासाठी करणार होती. श्यामसुंदर राठी, शैलेश राठी, शिल्पा राठी हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.

Comments
Add Comment

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

Asha Bhosle Heart Attack : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग : नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात